शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

पसार लाचखोर अपर तहसीलदार नितीन गर्जे याचा रजेसाठी अर्ज; पोलिसांना मात्र सापडेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 19:46 IST

१७ दिवसांपासून गर्जे पोलिसांच्या हाती लागत नाही. त्याने घराचे पत्तेदेखील वेगवेगळ्या ठिकाणचे दिले होते.

छत्रपती संभाजीनगर : अपर तहसीलदार नितीन गर्जे लाचप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून पसार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक त्याचा शोध घेत असतानाच दुसरीकडे गर्जेने प्रशासनाकडे रजा मिळावी, यासाठी दोनवेळा अर्ज केला आहे.

यासंदर्भात प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी संगीता राठोड म्हणाल्या, अन्य व्यक्तीकडून गर्जे यांनी रजेचा अर्ज केला, परंतु प्रशासनाने तो मंजूर केला नाही. गर्जे पोलिसांच्या हाती लागत नाही, परंतु प्रशासनाकडे अर्ज करत आहे. १७ दिवसांपासून गर्जे पोलिसांच्या हाती लागत नाही. त्याने घराचे पत्तेदेखील वेगवेगळ्या ठिकाणचे दिले होते. त्यामुळे हा सगळा नेमका प्रकार कशासाठी सुरू होता, यावरून प्रशासनात चर्चा सुरू आहे. गर्जेनंतर लाचखोरीच्या प्रकरणात अडकलेले निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्यासह गर्जेचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे पुढील कारवाई केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, बिडकीन येथील शेतकऱ्यांची शासनाने मंजूर केलेली मोबदल्याची प्रकरणे चार महिन्यांपासून रखडली आहेत. खिरोळकर यांच्याकडेच हे प्रकरण होते. त्यांनी शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी सुरू केल्याचा आरोप मध्यंतरी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडेच केला होता. शेतकऱ्यांनी बिडकीन येथील उद्योगांचे काम बंद पाडले होते. ते काम पुन्हा बंद करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

१०१ प्रकरणे खिरोळकरांनी का अडविली?बिडकीन परिसरातील बन्नी तांडा, बंगल तांडा येथील वर्ग-२ जमिनीचा २० टक्के भूसंपादनाचा मोबदला न मिळाल्यामुळे डीएमआयसीतील बड्या उद्योगांचे काम शेतकऱ्यांनी आंदोलन करून बंद पाडल्यानंतर हे प्रकरण मंत्रालयापर्यंत पोहोचले हाेते. मोबदल्यासाठी शेतकऱ्यांनी एन्डयुरन्स, आयबीएस, कॉस्मो, प्रगती कन्स्ट्रक्शन्स, स्वस्तिक, एथर, जेएसडब्ल्यू, टोयोटा या कंपन्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरचे काम बंद पाडून आंदोलन केले होते. वर्ग-२ गायरान जमिनीचे विनापरवानगी झालेले खरेदीखत नियमानुकूल करण्यासाठी शासनाने १४३ पैकी ३२ प्रकरणांना ३० जानेवारी रोजी मान्यता दिली. १४३ पैकी १०१ प्रकरणे उरली होते परंतु खिरोळकरांनी ती प्रकरणे अडवून ठेवण्यामागे चिरीमिरी हेच कारण असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग