शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांच्या अडचणीवर होणार परभणीत मंथन

By admin | Updated: August 14, 2014 02:08 IST

परभणी : मराठवाड्यातील व्यापार विषयक अडचणी, विकास, कायदेविषयक समस्या, व्यापार व कररचना या संदर्भात विचार मंथन करण्यासाठी परभणी येथे मराठवाडा विभागीय व्यापार परिषदेचे १७ आॅगस्ट रोजी आयोजन करण्यात आले

परभणी : मराठवाड्यातील व्यापार विषयक अडचणी, विकास, कायदेविषयक समस्या, व्यापार व कररचना या संदर्भात विचार मंथन करण्यासाठी परभणी येथे मराठवाडा विभागीय व्यापार परिषदेचे १७ आॅगस्ट रोजी आयोजन करण्यात आले असल्याची माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत माहिती देताना अध्यक्ष अग्रवाल म्हणाले की, महाराष्ट्रात तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी दुष्काळ निवारणार्थ ५० रुपये तात्पुरता व्यवसायिक कर लावला होता. आज हा कर २ हजार ५०० रुपयापर्यंत वाढवून तो कायम करण्यात आला आहे, हे अन्यायकारक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वायत्ता मिळावी, यासाठी सुरु केलेला चुंगीकर केवळ महाराष्ट्रातच आहे. यामुळे व्यापाऱ्यांना वेठीस धरले जात आहे. मूल्यवर्धीतकर स्वीकारण्यासाठी व्यावसायिक कर, उपकर, चुंगीकर, विक्रीकर बंद करु, असे आश्वासन शासनाने दिले होते.
याशिवाय वाढलेले भारनियमन, एलबीटीबाबतच्या जाचक अटी आदी संदर्भात चर्चा करण्यासाठी तसेच सुटसुटीत कररचना व एक खिडकी पद्धती असावी, ‘व्यापारी पेंशन प्लान’ योजना सुरु करावी, आदी मागण्या संदर्भातही परभणीत १७ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता अक्षदा मंगल कार्यालयात होणाऱ्या मराठवाडा विभागीय व्यापार परिषदेत चर्चा करण्यात येणार आहे. मराठवाडा चेंबर आॅफ ट्रेड अ‍ॅण्ड कॉमर्सच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विविध उद्योजकांची व मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याचे ते म्हणाले. या पत्रपरिषदेस मराठवाडा चेंबर आॅफ कॉर्मसचे कार्याध्यक्ष तथा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष नितीन वट्टमवार, सचिव सूर्यकांत हाके आदींची उपस्थिती होती.
(प्रतिनिधी)