विशेष मुलांचे पालकही 'स्पेशल' असतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:02 IST2021-05-29T04:02:56+5:302021-05-29T04:02:56+5:30
आरंभ ऑटिझम सेंटरतर्फे विशेष मुलांसाठी मुक्तांगण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शर्वरी जमेनिस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शिबिराचा समारोप झाला. ...

विशेष मुलांचे पालकही 'स्पेशल' असतात
आरंभ ऑटिझम सेंटरतर्फे विशेष मुलांसाठी मुक्तांगण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शर्वरी जमेनिस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शिबिराचा समारोप झाला. यावेळी त्यांनी विशेष मुलांच्या शिक्षकांचे तसेच पालकांचे मनापासून कौतुक केले. स्वराज राजपूत, रुची गोताड, ईशान हलाके, चंद्रांश नलबलवाल, अवनी आणि अनाया घोपे, शारंग मायभाटे, शुभम गौतम, अवनीस तोरडमल, सोहम मंडलिक, अधीश मुरांडे, आरोही पाटील, देवांशी वैष्णव, भक्ती कुलकर्णी आणि अक्षय बागुल यांनी सादरीकरण केले. मंजूषा राऊत, चेतन पाटील, सौरभ दरख, कीर्ती कुलकर्णी, प्रज्ञा देशपांडे, गौरव नायगावकर आणि प्रगती बागुल यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. आरंभच्या संचालिका अंबिका टाकळकर यांनी आभार मानले.
फोटो ओळ :
आरंभ आयोजित मुक्तांगण शिबिरात संवाद साधताना अभिनेत्री शर्वरी जमेनिस.