शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

ब्रेनडेड झालेल्या चिमुकल्याच्या मृत्यूने पालक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 7:02 PM

योगशाळेच्या अहवालानंतर दोषी डॉक्टर व संबंधितांवर गुन्हा दाखल होईल. 

ठळक मुद्देसातारा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद हेडगेवार रुग्णालयातील डॉक्टरांवर आरोपअहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निर्णय होणार

औरंगाबाद :  डॉ़  हेडगेवार रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या बे्रनडेड झालेल्या दोनवर्षीय चिमुकल्याची गुरुवारी (दि़. ७) रात्री ११.२५ वाजेच्या सुमारास प्राणज्योत मालवली़  दरम्यान रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान तज्ज्ञ समितीच्या उपस्थितीत शुक्रवारी यशच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर दोषी डॉक्टर व संबंधितांवर गुन्हा दाखल होईल. 

यश कैलास भातपुडे (२ वर्ष, रा. हायकोर्ट कॉलनी, सातारा) या रुबेला लसीकरण केलेल्या दोन वर्षीय मुलाचा गुरुवारी रात्री डॉ. हेडगेवार रुग्णालयात आधी ब्रेनडेड झाला आणि त्याच रात्री मृत्यू झाला. गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास डॉ़  हेडगेवार रुग्णालयात डॉक्टर आणि यशचे पालक व नातेवाईक यांच्यात शाब्दिक चकमकही झाली होती. त्यामुळे रुग्णालयाविरुद्ध तक्रार देण्यासाठी भातपुडे हे सातारा पोलीस ठाण्यात गेले मात्र पोलिसांनी भातपुडे यांची तक्रार घेण्यास नकार दिला होता. गुरुवारी रात्री यशचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक आणखीनच संतप्त झाले. संतप्त नातेवाईकांनी पुन्हा डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप केला़  यशचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची माहिती लगेच द्या, अशी मागणी रात्री लावून धरली.

यशच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी जवाहनगर पोलिसांकडे लेखी स्वरुपात तक्रार दिली आहे़  रुबेला लसीकरण व उपचारामध्ये हलगर्जीपणा, अवास्तव औषधी देणारे डॉ़  हेडगेवार रुग्णालय प्रशासन यांना जबाबदार ठरवून यशच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी भातपुडे यांनी केली आहे. यशच्या मृतदेहाचे इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात यावे, अशी मागणीही यशच्या पालकांनी केली. 

मृत्यू झाल्यानंतर यशचा मृतदेह सकाळपर्यंत हेडगेवार रुग्णालयातच ठेवण्यात आला. हेडगेवार रुग्णालयात गुरुवारी रात्रीपासून भातपुडे यांचे नातेवाईक जमा झाले होते. शुक्रवारी सकाळी रुग्णालयात पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. दुपारी दोन वाजता यशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात नेण्यात आला. भातपुडे कुटुंबियांची शवविच्छेदन ‘इन कॅमेरा’ करण्याची मागणी होती; मात्र घाटी रुग्णालयातील तीन डॉक्टरांच्या देखरेखीखाली शवविच्छेदन करण्यात आले.  शुक्रवारी प्रतापनगर स्मशानभूमीत चिमुकल्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

अहवाल आल्यानंतर गुन्हा  यशचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्यासाठी व्हिसेरा प्रयोगशाळेला पाठविला असून, त्याचा अहवाल आल्यानंतरच गुन्हा दाखल होणार आहे, असे सातारा ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक सुभाष भोसले यांनी सांगितले. दरम्यान, सातारा ठाण्यात यशच्या मृत्यूची अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

नातेवाईकांचा आरोपयशचे काका अविनाश भातपुडे यांनी सांगितले की, इन कॅमेरा शवविच्छेदनाची आमची मागणी मान्य झालेली नाही. हेडगेवार रुग्णालयाने यशवर काय उपचार केले यासंबंधीची कागदपत्रे दिलेली नाहीत. या प्रकरणात गुन्हाही दाखल झालेला नाही. त्यामुळे आम्ही सोमवारी न्यायालयात जाण्याचा विचार करीत आहोत. 

योग्यप्रकारे उपचार  रुग्णालयात सदर बालक दाखल झाल्यानंतर त्याच्यावर योग्यप्रकारे उपचार करण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या उपचारासंदर्भातील संपूर्ण माहिती नातेवाईकांना दिलेली आहे़. मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे शवविच्छेदन आणि व्हायरोलॉजी लॅबचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल.- डॉ़  अश्विनीकुमार तुपकरी, मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ़  हेडगेवार रुग्णालय

टॅग्स :Deathमृत्यूhospitalहॉस्पिटलPoliceपोलिस