शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

पार्सलची ने-आण रामभरोसे

By admin | Updated: August 18, 2014 00:38 IST

संतोष हिरेमठ, औरंगाबाद एस. टी. महामंडळाच्या बस, रेल्वे आणि खाजगी बससेवेच्या पार्सल सेवेत विविध तपासणी यंत्रणेचा, साहित्याचा अभाव आहे.

संतोष हिरेमठ, औरंगाबादएस. टी. महामंडळाच्या बस, रेल्वे आणि खाजगी बससेवेच्या पार्सल सेवेत विविध तपासणी यंत्रणेचा, साहित्याचा अभाव आहे. तपासणी यंत्रणाच नसल्याने आवक-जावकची नोंद केवळ कागदावरच राहत असून, पार्सलमध्ये नेमके काय आहे, हे कळण्याचा मार्गच नाही. परिणामी अशा पार्सल यंत्रणेचा दुरुपयोग करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पार्सल सेवा असुरक्षित असल्याचे चित्र आहे.राज्यात गुटखाबंदी आहे. त्यामुळे परराज्यांतून गुटखा आणून तो दामदुप्पट दराने विकला जात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत परराज्यांतून ट्रॅव्हल्स बसमधून औरंगाबाद शहरात पार्सलच्या नावाखाली गुटखा आयात करण्यात येत असल्याचे नुकतेच पोलिसांनी केलेल्या कारवाईतून उघडकीस आले. एस. टी. महामंडळाचे मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानक याठिकाणी पार्सल विभाग आहे. शिवाय शहरात अनेक खाजगी बससेवेची पार्सल सेवा आहे. महिन्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणाहून पार्सल विविध ठिकाणी पाठविले जातात आणि विविध ठिकाणांहून पाठविलेले पार्सल दाखल होतात. या पार्सलची नोंद केली जाते. पार्सलचे वजन करून पोहोचविण्यात येणाऱ्या ठिकाणापर्यंतचे शुल्क घेतले जाते. पार्सलवर आतील मालाची नोंद केली जाते; परंतु प्रत्यक्ष पार्सलमध्ये नेमके काय आहे, हे पाहण्याक डे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. पार्सल आणून देणाऱ्या व्यक्तीच्या विश्वासावरच पार्सलची ने-आण सुरू असल्याचे दिसून येते. वजन करून झाल्यानंतर पार्सल कर्मचाऱ्याकडे सुपूर्द केल्यानंतर तो ते नेमक्या ठिकाणी जाणाऱ्या रेल्वे, बसपर्यंत घेऊन जातो आणि रेल्वे, बसच्या आतमध्ये पार्सल ठेवून देतो. पार्सलमध्ये नेमके काय आहे, याकडे कोणीही गांभीर्याने बघत नसल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.अत्याधुनिक यंत्रणेचा अभावकोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून देणाऱ्या औरंगाबादच्या मॉडेल रेल्वेस्थानकावरील पार्सल विभागात कोणतीही अत्याधुनिक यंत्रणा दिसून येत नाही. अनेकदा पार्सल प्लॅटफॉर्मवर पडून असल्याचे दिसून येते. पार्सलच्या सुरक्षेसाठी कोणीही नसते. आलेल्या पार्सलची तपासणी करण्यासाठी रेल्वे, मध्यवर्ती बसस्थानक आणि अन्य ठिकाणी आवश्यक अशा मोठ्या स्कॅनरचा अभाव दिसून येतो. डोअर मेटल डिटेक्टरचाही अभाव दिसून येतो.प्रवाशांबरोबरच पार्सलची वाहतूकपार्सलच्या तपासणीक डे दुर्लक्ष केले जात असल्याने पार्सलवर नोंद केलेल्या माल न राहता दुसराच माल राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. खाजगी बसमधून गुटख्याची आयात होत असल्याचे उघडकीस आले. यामुळे तोडक्या यंत्रणेचा लाभ चुकीच्या कामासाठी होण्याचा धोका वाढत आहे. शिवाय पार्सलची वाहतूक प्रवाशांबरोबरच केली जाते. त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी सुरक्षेची यंत्रणा उभारणे आवश्यक आहे.