पार्सलची ने-आण रामभरोसे

By Admin | Updated: August 18, 2014 00:38 IST2014-08-18T00:20:09+5:302014-08-18T00:38:18+5:30

संतोष हिरेमठ, औरंगाबाद एस. टी. महामंडळाच्या बस, रेल्वे आणि खाजगी बससेवेच्या पार्सल सेवेत विविध तपासणी यंत्रणेचा, साहित्याचा अभाव आहे.

Parcelki's N-and Ram Bharose | पार्सलची ने-आण रामभरोसे

पार्सलची ने-आण रामभरोसे

संतोष हिरेमठ, औरंगाबाद
एस. टी. महामंडळाच्या बस, रेल्वे आणि खाजगी बससेवेच्या पार्सल सेवेत विविध तपासणी यंत्रणेचा, साहित्याचा अभाव आहे. तपासणी यंत्रणाच नसल्याने आवक-जावकची नोंद केवळ कागदावरच राहत असून, पार्सलमध्ये नेमके काय आहे, हे कळण्याचा मार्गच नाही. परिणामी अशा पार्सल यंत्रणेचा दुरुपयोग करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पार्सल सेवा असुरक्षित असल्याचे चित्र आहे.
राज्यात गुटखाबंदी आहे. त्यामुळे परराज्यांतून गुटखा आणून तो दामदुप्पट दराने विकला जात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत परराज्यांतून ट्रॅव्हल्स बसमधून औरंगाबाद शहरात पार्सलच्या नावाखाली गुटखा आयात करण्यात येत असल्याचे नुकतेच पोलिसांनी केलेल्या कारवाईतून उघडकीस आले. एस. टी. महामंडळाचे मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानक याठिकाणी पार्सल विभाग आहे. शिवाय शहरात अनेक खाजगी बससेवेची पार्सल सेवा आहे. महिन्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणाहून पार्सल विविध ठिकाणी पाठविले जातात आणि विविध ठिकाणांहून पाठविलेले पार्सल दाखल होतात.
या पार्सलची नोंद केली जाते. पार्सलचे वजन करून पोहोचविण्यात येणाऱ्या ठिकाणापर्यंतचे शुल्क घेतले जाते. पार्सलवर आतील मालाची नोंद केली जाते; परंतु प्रत्यक्ष पार्सलमध्ये नेमके काय आहे, हे पाहण्याक डे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. पार्सल आणून देणाऱ्या व्यक्तीच्या विश्वासावरच पार्सलची ने-आण सुरू असल्याचे दिसून येते. वजन करून झाल्यानंतर पार्सल कर्मचाऱ्याकडे सुपूर्द केल्यानंतर तो ते नेमक्या ठिकाणी जाणाऱ्या रेल्वे, बसपर्यंत घेऊन जातो आणि रेल्वे, बसच्या आतमध्ये पार्सल ठेवून देतो. पार्सलमध्ये नेमके काय आहे, याकडे कोणीही गांभीर्याने बघत नसल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.
अत्याधुनिक यंत्रणेचा अभाव
कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून देणाऱ्या औरंगाबादच्या मॉडेल रेल्वेस्थानकावरील पार्सल विभागात कोणतीही अत्याधुनिक यंत्रणा दिसून येत नाही. अनेकदा पार्सल प्लॅटफॉर्मवर पडून असल्याचे दिसून येते. पार्सलच्या सुरक्षेसाठी कोणीही नसते. आलेल्या पार्सलची तपासणी करण्यासाठी रेल्वे, मध्यवर्ती बसस्थानक आणि अन्य ठिकाणी आवश्यक अशा मोठ्या स्कॅनरचा अभाव दिसून येतो. डोअर मेटल डिटेक्टरचाही अभाव दिसून येतो.
प्रवाशांबरोबरच पार्सलची वाहतूक
पार्सलच्या तपासणीक डे दुर्लक्ष केले जात असल्याने पार्सलवर नोंद केलेल्या माल न राहता दुसराच माल राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. खाजगी बसमधून गुटख्याची आयात होत असल्याचे उघडकीस आले.
यामुळे तोडक्या यंत्रणेचा लाभ चुकीच्या कामासाठी होण्याचा धोका वाढत आहे. शिवाय पार्सलची वाहतूक प्रवाशांबरोबरच केली जाते. त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी सुरक्षेची यंत्रणा उभारणे आवश्यक आहे.

Web Title: Parcelki's N-and Ram Bharose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.