शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत सव्वादोन लाखांची घरफोडी

By admin | Updated: May 26, 2014 00:57 IST

परभणी : शहरातील दत्तनगरात सव्वादोन लाखांची घरफोडी झाली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

परभणी : शहरातील दत्तनगरात सव्वादोन लाखांची घरफोडी झाली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. २४ मे रोजी दत्तनगरातील रहिवासी रवीशंकर रामराव शेळके यांचे कुटुंबीय वरच्या मजल्यावर झोपले असता पहाटे दोन ते तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी किचन रुमच्या खिडकीचे ग्रिल तोडून घरात प्रवेश केला. खालच्या खोलीमध्ये असलेल्या शेळके यांच्या आजीला चाकूचा धाक दाखवून रोख ३५ हजार रुपये व ७२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या, कर्णफूल, अंगठ्या, दोन मोबाईल असा एकूण २ लाख १० हजार रुपये किमतीचा माल चोरट्यांनी लंपास केला. घटनेनंतर रवीशंकर शेळके यांनी तत्काळ नानलपेठ पोलिसांना दूरध्वनी करून घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. (प्रतिनिधी)या घटनेबाबत तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वानपथकाने दत्त मंदिर परिसरापर्यंत माग काढला. नानलपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास किशोर तरोणे हे करीत आहेत. मागील काही दिवसांपासून परभणी शहरात चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील वार्डात व गल्लीत रात्रीची गस्त सुरू करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांच्या वतीने होत आहे.