परभणीत आंबा महोत्सव
By Admin | Updated: May 11, 2014 23:59 IST2014-05-11T23:54:53+5:302014-05-11T23:59:48+5:30
परभणी : युवा सेनेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ.राहुल पाटील यांनी १४ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ८ या वेळेत आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे.

परभणीत आंबा महोत्सव
परभणी : युवा सेनेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ.राहुल पाटील यांनी १४ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ८ या वेळेत आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या या आंब्याच्या विविध जाती आणि वाण या महोत्सवात ठेवले जाणार आहेत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हा महोत्सव आयोजित केला आहे. शिवाजीनगरातील स्वामी समर्थ मंदिरासमोरील तोरणा निवास या ठिकाणी हा महोत्सव होत आहे. कार्यक्रमासाठी फू बाई फू फेम सिनेतारका किशोरी अंबिये यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कोकणातील वैभववाडी येथील डॉ.राहुल पाटील यांच्या अन्नतंत्र महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रातील हापूस, पायरी, लंगडा, केशर, रत्ना, सिंधू, तोतापुरी व इतर जातीचे आंबे या महोत्सवात ठेवले जाणार आहेत. या आंबा महोत्सवाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे. (प्रतिनिधी) आंबा खाण्याची स्पर्धा या महोत्सवाच्या निमित्ताने वयोगटानुसार मुला-मुलींसाठी एक मिनिटात आंबा खाण्याची स्पर्धा आणि महिलांसाठी विविध मनोरंजनाच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. सायंकाळी ४ ते ७ असा स्पर्धेचा वेळ राहणार आहे. विजेत्यांना २१००, ११०० आणि ५०० रुपये अशी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिके दिली जातील.