परभणी लोकसभेची भाजपकडून तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:37 IST2017-10-04T23:37:09+5:302017-10-04T23:37:09+5:30

परभणी लोकसभा मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून तयारी सुरू करण्यात आली असून, या अनुषंगाने बुधवारी या मतदार संघाचे प्रभारी तथा उत्तर प्रदेशचे आरोग्य राज्यमंत्री डॉ़ महेंद्रसिंह यांनी कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेवून त्यामध्ये जिल्ह्यातील बुथ मजबुतीकरणाचा मंत्र दिला़ तसेच भाजप सरकारने घेतलेल्या योजनांची सर्वसामान्यांपर्यंत माहिती पोहचविण्याचे आदेश दिले़

Parbhani BJP is preparing for the Lok Sabha elections | परभणी लोकसभेची भाजपकडून तयारी सुरू

परभणी लोकसभेची भाजपकडून तयारी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी लोकसभा मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून तयारी सुरू करण्यात आली असून, या अनुषंगाने बुधवारी या मतदार संघाचे प्रभारी तथा उत्तर प्रदेशचे आरोग्य राज्यमंत्री डॉ़ महेंद्रसिंह यांनी कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेवून त्यामध्ये जिल्ह्यातील बुथ मजबुतीकरणाचा मंत्र दिला़ तसेच भाजप सरकारने घेतलेल्या योजनांची सर्वसामान्यांपर्यंत माहिती पोहचविण्याचे आदेश दिले़
भाजपाच्या वतीने २०१९ मध्ये होणाºया लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे़ या अनुषंगाने परभणी लोकसभा मतदार संघासाठी प्रभारी म्हणून पक्षाचे उत्तर प्रदेशचे आरोग्य राज्यमंत्री डॉ़ महेंद्रसिंह यांची नियुक्ती केली आहे़ त्या अनुषंगाने मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी बुधवारी डॉ़ महेंद्रसिंह परभणीत आले होते़ यावेळी शिवाजी महाविद्यालयातील सभागृहात घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी परभणी लोकसभा मतदार संघातील १९०० बुथचे मजबुतीकरण करण्याचा कार्यकर्त्यांना सल्ला दिला़ प्रत्येक बुथवर ५१ कार्यकर्त्यांची नियुक्ती करून त्यामध्ये शेतकरी, वकील, डॉक्टर्स, त्या परिसरातील प्रतिष्ठीत व्यक्तींचा समावेश करावा व केंद्र व राज्य सरकारने जनहिताच्या घेतलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवावी, असे आदेश दिले़ प्रत्येक बुथवरील किमान १० कार्यकर्त्यांकडे वाहन असले पाहिजे़ जेणे करून निवडणुकीच्या काळात मतदारांना मतदानासाठी आणण्याकरीता ते उपयोगी होईल़ तसेच येत्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला देशात ४०० जागा जिंकायच्या आहेत़ त्यामुळे त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आदेशही त्यांनी दिले़ यावेळी व्यासपीठावर पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, जिल्हाध्यक्ष अभय चाटे, महानगर अध्यक्ष आनंद भरोसे, विभागीय महामंत्री देशमुख, डॉ़ प्रफुल्ल पाटील, मेघना बोर्डीकर आदींसह परभणी जिल्ह्यातील ४ व जालना जिल्ह्यातील २ विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकाºयांची उपस्थिती होती़

Web Title: Parbhani BJP is preparing for the Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.