प्रक्रिया केलेले पाणी ‘समृद्धी’ला विकण्याचा ठराव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 05:33 PM2019-01-15T17:33:32+5:302019-01-15T17:33:57+5:30

प्रक्रिया केलेले पाणी समृद्धी महामार्गाच्या कामासाठी वापरण्यास सोमवारी स्थायी समितीने मंजुरी दिली.

parakaraiyaa-kaelaelae-paanai-samardadhailaa-vaikanayaacaa-tharaava-manjauura | प्रक्रिया केलेले पाणी ‘समृद्धी’ला विकण्याचा ठराव मंजूर

प्रक्रिया केलेले पाणी ‘समृद्धी’ला विकण्याचा ठराव मंजूर

googlenewsNext

औरंगाबाद : भूमिगत गटार योजनेच्या माध्यमातून महापालिकेने शहरात तीन ठिकाणी छोटे-मोठे एसटीपी प्लँट उभे केले आहेत. या प्रकल्पांमध्ये दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. प्रक्रिया केलेले पाणी समृद्धी महामार्गाच्या कामासाठी वापरण्यास सोमवारी स्थायी समितीने मंजुरी दिली.


महापालिकेने भूमिगत गटार योजनेअंतर्गत कांचनवाडी, झाल्टा, पडेगाव येथे एसटीपी प्लँट उभारले आहेत. या तीन प्लँटमधून प्रक्रिया केलेले ८० ते ८५ दलघमी पाणी दररोज नाल्यांमध्ये सोडण्यात येत आहे. प्रक्रियायुक्त पाणी औद्योगिक क्षेत्राला देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार महापालिकेने एमआयडीसी, डीएमआयसीसोबत वारंवार पत्रव्यवहार केला. निविदाही प्रसिद्ध करण्यात आल्या. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हे पाणी नाल्यांमध्ये सोडून दिले जात आहे. दरम्यान, हे पाणी समृद्धी महामार्गाला देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता. समृद्धीचे काम करणाºया कंपन्यांना हे पाणी विकण्यात येईल.

त्यासाठी कंपनीसोबत करार करणे गरजेचे असल्याने सोमवारी मनपा प्रशासनातर्फे स्थायी समितीसमोर प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावावर नगरसेवकांनी अनेक प्रश्न उपस्थित करून अधिकाºयांना भंडावून सोडले. कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी यांनी सांगितले की, केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून भूमिगत गटार योजनेचे काम करण्यात आले आहे. त्यानुसार किमान १० टक्के प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर झाला पाहिजे. स्थायी समितीने प्रस्ताव मंजूर केल्यामुळे पुढील काळात कंपनीसोबत करार करण्यात येणार आहे.


प्रकल्प क्षमता बाहेर पडणारे पाणी
कांचनवाडी १६१ दलघमी ६५ ते ७० दलघमी
झाल्टा ३५ दलघमी १० दलघमी
पडेगाव १० दलघमी ०२ दलघमी

 

Web Title: parakaraiyaa-kaelaelae-paanai-samardadhailaa-vaikanayaacaa-tharaava-manjauura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.