शेंद्रा येथे पांडुरंगाची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 22:40 IST2019-07-12T22:40:31+5:302019-07-12T22:40:48+5:30
आषाढी एकादशीनिमित्त शेंद्रा कमंगर येथे पांडुरंगाची मिरवणूक व दिंडी काढण्यात आली.

शेंद्रा येथे पांडुरंगाची मिरवणूक
शेंद्र्रा : आषाढी एकादशीनिमित्त शेंद्रा कमंगर येथे पांडुरंगाची मिरवणूक व दिंडी काढण्यात आली.
यावेळी विठ्ठल नामाचा जयघोष करून सांप्रदायिक मंडळींनी भजन, हरिपाठ म्हणत पाऊले टाकुन फुगडी खेळण्यात आली.
मिरवणुकीत गावातील बालगोपाळ, तरुण, महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी भजनी मंडळी माऊली कचकुरे, बाळाराम कचकुरे, बळीराम कचकुरे, गोरख सोनवणे, चोपडे, अंकुश कचकुरे, सुभास सोनवणे, शिवा जैस्वाल, सोनु बरडे , मुदंगाचार्य आणिल महाराज तांबे, राजू तांबे, संजू सोनवणे, लखन गाडेकर, भूषण भारसाखळे, आकाश जैस्वाल, सरपंच रवींद्र तांबे, उपसरपंच पांडुरंग कचकुरे, पोलीस पाटील आफसर पठाण आदी उपस्थित होते.