शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

मालकीहक्कच असुरक्षित...!

By admin | Updated: December 20, 2015 23:53 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड जागेच्या मालकी बाबतच्या प्रकरणांमध्ये मोठे वाद आहेत. भूमीअभिलेख कार्यालयात याबाबत नागरीकांचे आक्षेप अर्ज असताना देखील जागेंचे फेरफार होतात.

व्यंकटेश वैष्णव , बीडजागेच्या मालकी बाबतच्या प्रकरणांमध्ये मोठे वाद आहेत. भूमीअभिलेख कार्यालयात याबाबत नागरीकांचे आक्षेप अर्ज असताना देखील जागेंचे फेरफार होतात. जमीनींचे मालकी हक्कच असुरक्षीत आहेत. धनदांडग्यांना जमिनी बळकवून देण्यासाठी मदत करणारी टोळीच भूमीअभिलेख कार्यालयात सक्रीय आहे. याचे पुरावे ‘लोकमत’कडे उपलब्ध आहेत.येथील भूमी अभिलेख कार्यालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर येत आहे. खासरा पत्रक नसताना सातबारा बनवून जमीनींचे व्यवहार झाल्याचे यापूर्वीच समोर आले आहे. आता तर क्षेत्र शिल्लक नसताना देखील फेरफार ओढल्याने जागेचे मूळ मालक हादरले आहे. ही परिस्थिती केवळ बीड शहरापुरतीच मर्यादित नाही तर जिल्हयातील जमीनींचे मालकी हक्क धोक्यात आले आहेत. बीड येथील ललीत अब्बड व इतरांनी सिटी सर्व्हे नंबर ४५९९ या जागेवर क्षेत्र शिल्लक नसताना देखील दुसऱ्या एका व्यक्तीच्या नावे फेर करून दिल्याबाबत लेखी आक्षेप घेतला. असे असताना देखील भूमी अभिलेख कार्यालयाने दुसऱ्या एका व्यक्तीचे नावाने फेर ओढला. अब्बड यांनी २ डिसेंबर २०१४ दरम्यान आक्षेप अर्ज केला होता. या अर्जाकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करत सदरील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ३० जुलै २०१५ रोजी फेरफार करून दिला. आक्षेप अर्जानंतर १७ महिन्यांनी भूमी अभिलेख कार्यालयाने आक्षेप अर्ज निकाली न काढता. खोटे कागदपत्र तयार करून फेरफार ओढला व १९ आॅगस्ट २०१५ रोजी मंजूर केले असल्याचे चेतन अब्बड यांनी सांगितले.मूळ जागा मालकाचेवारसदारच केले बेघरभूमी अभिलेख उप अधीक्षक कार्यालयाच्या बोगस कारभाराच्या नवनवीन कथा समोर येत आहेत. कागदपत्रांचा खेळ करत चक्क मूळ जागा मालकाच्या वारसदारानांच बेवारस करण्याचा प्रकार केला आहे. शहरातील हिरालाल चौक, बुरूड गल्ली येथील सिटी सर्व्हे नं.४५९९ मधील ५३.१ क्षेत्रातील अर्धी जागा मालकीची असताना देखील रेकॉर्डवर ही जागा नसल्याचे दाखवून जागा मालक मन्नूलाल अब्बड यांच्या वारसदारांना बेघर केले असल्याचे कागदपत्रावरून स्पष्ट होते.न्याय न मिळाल्यास न्यायालयात धावआक्षेप अर्ज दिलेला असतानाही १७ महिन्यानंतर फेरफारला मंजुरी दिली जाते. यामुळे आमच्यावर अन्याय होत आहे. याबाबत न्याय मिळाला नाही तर आम्ही न्यायालयात जाणार आहोत, असा इशारा आक्षेप अर्जदार चेतन अब्बड यांनी दिला.