उस्मानाबादेत भरदिवसा घरफोडी
By Admin | Updated: December 30, 2014 01:16 IST2014-12-30T01:11:59+5:302014-12-30T01:16:16+5:30
उस्मानाबाद : शहरातील महात्मा गांधी नगर परिसरात भरदिवसा चोरट्यांनी घरफोडी करून चार लाख ६२ हजार रूपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले़

उस्मानाबादेत भरदिवसा घरफोडी
उस्मानाबाद : शहरातील महात्मा गांधी नगर परिसरात भरदिवसा चोरट्यांनी घरफोडी करून चार लाख ६२ हजार रूपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले़ ही घटना सोमवारी सकाळी दहा ते दुपारी पावणे तीन वाजण्याच्या दरम्यान घडली असून, या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी सांगितले की, शहरातील प्रशांत श्रीमंत रणदिवे हे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त घराच्या बाहेर गेले होते़ दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास प्रशांत रणदिवे हे घरी आले असता घराचे कुलूप तोडून आतील कपाटातील दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले़ चोरट्यांनी पाच तोळ्याचा पोहेहार, चार तोळ्याचे गंठण, दीड तोळ्याचे नेकलेस, दीड तोळ्याचे फुले,झुबे, दीड तोळ्याचे लॉकीट, दोन अंगठ्या, मिनी लॉकेट, सहा नग बदक असा ४ लाख ६२ हजार रूपयांचे तब्बल १८ तोळे ५ ग्रॅमचे दागिने लंपास केले़
शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून संशयित ठिकाणी छापे मारून कारवाई केली़ मात्र, पोलिसांच्या हाती काही लागले नाही़ या प्रकरणी प्रशांत रणदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास प्ऱपोलीस उपाधीक्षक विकास नाईक हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)