शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

औट्रम आधीच बंद आता कन्नड, तलवाडा घाटातूनही वाहतूकीस ६ महिन्यांसाठी बंदी, पर्याय कोणते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 19:08 IST

६० ते ७० कि.मी.चा फेरा पडणार; चाळीसगाव, धुळ्याकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गे

छत्रपती संभाजीनगर : कन्नड, तलवाडा घाटादरम्यानच्या मार्गाची दुरुस्ती व रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू होणार असून २५ नोव्हेंबर ते २५ एप्रिल, २०२६ पर्यंत हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे.

या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक अन्य मार्गेे वळवण्यात आल्याचे जिल्हा पोलिसांनी सांगितले. यामुळे सुमारे १३ हजार जड वाहनांना वैजापूर ते नांदगाव मार्गे सुमारे ६० ते ७० कि.मी.चा वळसा घालून जिल्ह्यातील इतर भागांच्या मुख्य रस्त्याला यावे लागणार आहे. कारण उत्तर भारत, मध्य प्रदेश, गुजरातला जोडणारा औट्रम घाट २०२३ पासूनच जड वाहतुकीसाठी बंद आहे.

एमएसआयडीसीकडे तलवाडा घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. औट्रम घाटाचा पर्यायी रस्ताही खराब झाल्याने तो तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश न्यायालयाने मध्यंतरी दिले होते. त्यामुळे नांदगाव-मालेगाव-येवला-वैजापूर या मार्गावरून जड वाहतूक वळविण्याचा निर्णय झाला होता. नांदगाव- शिऊर बंगला ते तलवाडा रस्ता दुरुस्तीसाठी सहा महिने लागणार आहेत. बांधकाम विभागाचे अंतर्गत जिल्हा रस्ते जड वाहतुकीमुळे उखडून गेले आहेत.

पूर्वीचा मार्ग - वळवण्यात आलेल्या वाहतुकीचा मार्ग१. छत्रपती संभाजीनगरकडून कन्नड, तलवाडा घाटातून चाळीसगावकडे जाणारी वाहने साजापूर, लासूर, गंगापूर चौफुली, वैजापूर, येवला, मनमाड, चाळीसगाव, धुळ्याकडे जातील.२. छत्रपती संभाजीनगरकडून कन्नड, तलवाडा घाटातून धुळ्याकडे जाणारी वाहने - साजापूर (सोलापूर-धुळे मार्ग) माळीवाडा, समृद्धी महामार्गाने झांबरगावपर्यंत जाऊन खाली उतरून गंगापूर चौफुली, वैजापूर, येवला, मनमाड मार्गे धुळ्याकडे जातील.३ छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव, धुळेकडे जाणारी जड वाहतूक - साजापूर, कसाबखेडा फाटा, देवगाव रंगारी, शिऊर, वैजापूर मार्गे येवला, मनमाड, चाळीसगाव मार्गे धुळ्याकडे जाईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Talwada Ghat Closed for Six Months; Traffic Diversions Announced

Web Summary : Talwada Ghat will be closed for all vehicular traffic from November 25th, 2025, to April 25th, 2026, for road repairs and widening. Heavy vehicles will be diverted via Vaijapur-Nandgaon, adding 60-70 km. This closure follows the existing closure of the Outram Ghat, impacting traffic to North India, Madhya Pradesh, and Gujarat.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरhighwayमहामार्गDhuleधुळे