शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी लाखांत, तक्रारी केवळ १६,२८७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 2:42 PM

औरंगाबाद ३,८३३, जालना ७,४५३, बीड ४,४८८ आॅनलाईन पूर्वसूचना प्राप्त तक्रारींचा आणि जालन्यातून ५६३ आॅफलाईन तक्रारी पीक विमा जिल्हा समितीकडे आल्या.

ठळक मुद्देआतापर्यंत ४९२४ तक्रारींचा सर्व्हे करण्यात आला२८५३ तक्रारी विमा कंपन्यांकडून मंजूर

- योगेश पायघन 

औरंगाबाद : अतिवृष्टीसह इतर कारणांनी बाधित शेतकऱ्यांचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून लाखांत व्यक्त होत असताना केवळ १६ हजार २८७ तक्रारी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केल्या. त्यात औरंगाबाद ३,८३३, जालना ७,४५३, बीड ४,४८८ आॅनलाईन पूर्वसूचना प्राप्त तक्रारींचा आणि जालन्यातून ५६३ आॅफलाईन तक्रारी पीक विमा जिल्हा समितीकडे आल्या. आतापर्यंत ४९२४ तक्रारींचा सर्व्हे करण्यात आला असून, २८५३ तक्रारी विमा कंपन्यांनी मंजूर केल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली.

सप्टेंबरपर्यंतच्या नुकसानीचा अंतिम अहवाल लवकरच प्राप्त होईल, तर आॅक्टोबरचा प्राथमिक नुकसान अहवालानुसार सर्वेक्षण सुरू असल्याचे कृषी विभागाचे सहसंचालक डॉ. दिनकर जाधव यांनी सांगितले. नुकसानीच्या तीन दिवसांच्या आत तक्रार कृषी विभागाला मिळणे अपेक्षित असते.  आॅनालाईन १५ हजार ७२४ तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. तर आॅफलाईन केवळ जालना जिल्ह्यातून ५६३ तक्रारी करण्यात आल्या. जालना जिल्ह्यातून आलेल्या एकूण ८०१६ तक्रारींपैकी ३३८१ तक्रारी उशिरा, १२६६ पीक उभे नसताना, तर बीडमधील २४९ तक्रारी पीक उभे नसताना, ३४५ तक्रारी इतर कारणांनी फेटाळण्यात आल्या. औरंगाबाद जिल्ह्यातील १९ तक्रारी नाकारल्या गेल्या. १९ आॅक्टोबरपर्यंत आलेल्या तक्रारींतून औरंगाबाद जिल्ह्यात ८४५, जालना जिल्ह्यात १४६४ तर बीड जिल्ह्यात ३७९७ अशा ६१०६ तक्रारींचे सर्वेक्षण बाकी आहे.

शेतकऱ्यांकडून तक्रारींना अनुत्सुकताया तीन जिल्ह्यांत ८ लाख ३६ हजार हेक्टर क्षेत्र सप्टेंबरअखेर प्राथमिक अंदाजानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. त्यात १० लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना नुकसानीची झळ पोहचली असताना  आलेल्या तक्रारी फक्त १६ हजार २८७ आहेत. शेतकऱ्यांकडून तक्रारींना अनुत्सुकता असताना पीक काढणीनंतरही नुकसान झाल्याची नोंद करण्यासाठी राजकीय दबाब आणला जात असल्याने फिल्ड वर्क अवघड झाल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादRainपाऊसagricultureशेती