शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
4
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
5
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
6
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
7
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
8
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
9
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
10
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
11
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
12
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
13
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
14
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
15
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
16
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
17
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
18
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
19
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
20
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
Daily Top 2Weekly Top 5

१७ पैकी १२ प्रकल्प अद्यापही कोरडेच

By admin | Updated: July 4, 2014 00:20 IST

किनवट : जून महिना संपला तरी पाऊसच नसल्याने १७ पैकी १२ प्रकल्प अद्यापही कोरड्याच अवस्थेत आहेत़

किनवट : जून महिना संपला तरी पाऊसच नसल्याने १७ पैकी १२ प्रकल्प अद्यापही कोरड्याच अवस्थेत आहेत़ सद्यघडीला केवळ ७ टक्केच जलसाठा प्रकल्पात असल्याने कधी नव्हे एवढी भयानक परिस्थिती यंदा निर्माण झाल्याचे चित्र आहे़ गतवर्षी जूनअखेर १७ पैकी ६ प्रकल्प शंभर टक्के भरले होते़ यंदा त्याउलट तालुक्यात परिस्थिती आहे़तालुक्याचे वार्षिक पर्जन्यमान १ हजार २४० मि़मी़ इतके आहे़ गतवर्षी जूनअखेर ३८३ मि़मी़ पाऊस बरसला होता़ त्यामुळे नागझरी, लोणी हे दोन मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले होते़ तर सिरपूर, वरसांगवी, पिंपळगाव (कि़), अंबाडी हे लघू व बृहद प्रकल्पही तुडुंब भरले होते़ मोठा पाऊस होवूनही प्रकल्प उभारणीत गैरव्यवहार झाल्याने कुपटी व नंदगाव हे दोन प्रकल्प कोरड्या अवस्थेतच राहतात़ डोंगरगाव मध्यम प्रकल्प ५५ टक्के, पिंपळगाव -५३़५०, सावरगाव १८१, हुडी २२़२२, सिंदगी २५़६६, जलधरा ३७़७६, निचपूर ७८़०६, थोरा २५़७२, मुळझरा ४़५२ टक्के भरले होते़यंदा जूनअखेर केवळ ३२ मि़मी़ इतका पाऊस झाल्याने सिरपूर, वरसांंगवी, सावरगाव, अंबाडी, हुडी, सिंदगी, जलधरा, निचपूर, थोरा, मुळझरा व नेहमीचे कुपटी, नंदगाव हे १२ प्रकल्प सद्यघडीला कोरड्या अवस्थेत आहेत़ तर नागझरी २९़१६, लोणी ३२़२८, डोंगरगाव केवळ ३़८३, पिंपळगाव (कि़) ४९़८८, पिंपळगाव ७ टक्के इतकाच जलसाठा आहे़ तर मांडवी प्रकल्पात २९८़६० व निराळा प्रकल्पात ३१६़६५ टक्के इतकी पातळी आहे़ यंदा प्रकल्पातील जलसाठा पाहता तालुक्यात भयावह परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे़ (वार्ताहर)