उदगीर : नांदेड-बीदर रोडवर सुरु केलेल्या उड्डापुलाच्या कामामुळे उदगीरशहरालगत वसलेल्या वस्त्यांचे हाल सुरु आहेत़ या भागातील रहिवाश्यांचे रस्ते अडविण्यात आल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेऊन ८ दिवसांत तोडगा न काढल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला़उड्डाणपुलाच्या कामामुळे जवळचे रस्ते बंद करुन सार्वजनिक बांधकाम विभागाने ५ ते १० किमीचा वळसा घालावा लागणारे पर्यायी रस्ते उपलब्ध करुन दिले आहेत़ आसपासच्या रहिवाश्यांचा, वाहनधारकांचा कोणताही विचार न करता प्रशासनाने शेल्हाळ रोड व रिंग रोडचा वापर करण्याची सूचना केली़ त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे़ उदगीर लगतच्याच दत्तनगर (मादलापूर) परिसरात संतोषी माता नगर, हनुमान नगर या वस्त्यांमध्ये जवळपास १५ ते २० हजार नागरिक राहतात़ त्यांना शहरात येण्यासाठी रेल्वे गेट हा एकमेव मार्ग उपलब्ध होता़ तो उड्डाणपुलाच्या कामामुळे बंद करण्यात आल्याने पर्यायी रस्ता देणे बंधनकारक असतानाही बांधकाम विभागाने गैरसोय करुन ठेवल्याची लेखी कैफियत मंगळवारी नागरिकांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मांडली़ रस्ता बंद झाल्याने दैनंदिन जीवन ठप्प झाले असून रुग्णांची ने-आण करण्यासाठी कोणतेही वाहन रेल्वेगेटकडे येत नसल्यामुळे मोठीच अडचण होऊन बसली आहे़ त्यामुळे आगामी ८ दिवसांत पर्यायी रस्ता उपलब्ध न करुन दिल्यास विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही देऊन यासंदर्भात उद्भवणाऱ्या परिस्थितीस सार्वजनिक बांधकाम विभागास जबाबदार धरुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़ यावेळी उदयसिंह मुंडकर, नामदेव बनखडके, महाळप्पा रावणकोळे, शिवाजीराव कापडे, अनंतराव कुडलीकर, सतीश सावळे, सोमनाथ स्वामी, गुलाम शेख, माधव तेलंगे, विशाल रंडाळे, मदन वडले, धोंडिबा पांचाळ, पाशा पठाण यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती़
अन्यथा उपसणार बहिष्कारास्त्र
By admin | Updated: September 26, 2014 01:53 IST
उदगीर : नांदेड-बीदर रोडवर सुरु केलेल्या उड्डापुलाच्या कामामुळे उदगीरशहरालगत वसलेल्या वस्त्यांचे हाल सुरु आहेत़ या भागातील रहिवाश्यांचे रस्ते अडविण्यात
अन्यथा उपसणार बहिष्कारास्त्र
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}