शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबाद पालिकेला हायकोर्टाची चपराक

By admin | Updated: October 7, 2014 00:15 IST

उस्मानाबाद : येथील नगर परिषदेंतर्गत रोजंदारीवर काम करणाऱ्या २८ रोजंदारी सेविकांना हायकोर्टाने दिलासा दिला आहे. त्यांना नोकरीमध्ये कायम करण्यासाठीचा पदनिर्मितीचा प्रस्ताव

उस्मानाबाद : येथील नगर परिषदेंतर्गत रोजंदारीवर काम करणाऱ्या २८ रोजंदारी सेविकांना हायकोर्टाने दिलासा दिला आहे. त्यांना नोकरीमध्ये कायम करण्यासाठीचा पदनिर्मितीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करण्याचे आदेश नगर पालिकेला दिले आहेत. अशाच स्वरुपाचे आदेश लातूरच्या औद्योगिक न्यायालयाने दिले होते. या निर्णयाच्या विरुद्ध नगरपालिकेने हायकोर्टात धाव घेतली होती.उस्मानाबाद नगर पालिकेतील २८ रोजंदारी सेविकांनी नौकरीमध्ये कायम करण्यात यावे, म्हणून २०११ मध्ये लातूर येथील औद्योगिक न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यावर सदरील न्यायालयाने २८ रोजंदारी सेविकांना तीन महिन्याच्या आत म्हणजेच ६ सप्टेंंबर २०११ पासून नोकरीत कायम करण्यात यावे, असे तत्कालिन पालिका मुख्याधिकाऱ्यांना आदेशित केले होते. हा निर्णय होवून जवळपास दोन वर्षाचा कालावधी उलटूनही नगरपालिकेने त्याची अंमलबजावणी केली नाही. त्यावर संबंधित रोजंदारी सेविकांनी मराठवाडा लाल बावटा कामगार युनियनचे सरचिटणीस सी.एन. शिंदे यांच्या माध्यमातून विभागीय आयुक्त, कामगार आयुक्त, जिल्हाधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त लातूर यांच्याकडे न्यायालयीन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यावर संबंधित कार्यालयाने पदनिर्मितीचा प्रस्ताव पाठविणेबाबत पालिकेला आदेशीत केले होते. मात्र या आदेशाचीही अंमलबजावणी न करता औद्योगिक न्यायालयाच्या विरोधात पालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अपील दाखल केले. यावर सुनावणी झाली असता, हायकोर्टानेही रोजंदारी सेविकांना दिलासा दिला आहे. रोजंदारी सेविकांच्या पदनिर्मितीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्याबाबत पालिकेला आदेशित केले आहे. त्याचप्रमाणे सदरील प्रस्तावावर निर्णय होईपर्यंत उपरोक्त २८ रोजंदारी सेविकांच्या हिताच्या विरुद्ध कुठलाही निर्णय घेवू नये, असे मुख्याधिकाऱ्यांना आदेशित केल्याची माहिती अ‍ॅड. ए.एन. गडिमे यांनी दिली. गडिमे यांना अ‍ॅड. ए.व्ही.पाटील यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)