आगार व्यवस्थापकाच्या कार्यालयास औरंगाबाद मनपाने ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 14:31 IST2018-02-17T14:30:40+5:302018-02-17T14:31:12+5:30
मालमत्ता कर थकीत असल्यामुळे महानगरपालिकेने आज दुपारी मध्यवर्ती बसस्थानकातील आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयास टाळे ठोकले.

आगार व्यवस्थापकाच्या कार्यालयास औरंगाबाद मनपाने ठोकले टाळे
औरंगाबाद : मालमत्ता कर थकीत असल्यामुळे महानगरपालिकेने आज दुपारी मध्यवर्ती बसस्थानकातील आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयास टाळे ठोकले.
शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाकडे महानगरपालिकेचा ४ लाखाचा मालमत्ता कर थकीत आहे. मनपाने वारंवार नोटीस बजावूनही बसस्थानक प्रशासनाकडून याचा भरणा करण्यात आला नाही. यामुळे आज दुपारी महानगरपालिकेच्या पथकाने थकीत कराची वसुली करण्यासाठी आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयास टाळे ठोकले. यामुळे कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते.