बनावट कागदपत्राद्वारे संस्थेची फसवणूक

By Admin | Updated: September 8, 2014 00:33 IST2014-09-08T00:25:47+5:302014-09-08T00:33:24+5:30

लातूर : बनावट कागदपत्र तसेच शिक्के, लेटरपॅड तयार करून संस्थेची बदनामी केल्याप्रकरणी लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात रविवारी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The organization's fraud by a fake document | बनावट कागदपत्राद्वारे संस्थेची फसवणूक

बनावट कागदपत्राद्वारे संस्थेची फसवणूक


लातूर : बनावट कागदपत्र तसेच शिक्के, लेटरपॅड तयार करून संस्थेची बदनामी केल्याप्रकरणी लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात रविवारी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील महादेव नगर भागातील संत गोरोबाकाका विद्यालयात आरोपी माधव राजेंद्र नरहारे (वय ३०, रा. भडी, ता. लातूर) याने संस्थेचे बनावट कागदपत्र व शिक्के तयार केले. याबाबतची संस्थेला कोणतीही माहिती दिली नाही. शाळेचा खोटा शिक्का, खोटे लेटरपॅड, शिक्षक हजेरीपत्रक आदींचा वापर करून संस्थेची बदनामी व फसवणूक केल्याची तक्रार सखाराम धनाजी चव्हाण यांनी लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार माधव राजेंद्र नरहारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सय्यद करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The organization's fraud by a fake document

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.