शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
3
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
4
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
5
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
6
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
7
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
8
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
9
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
10
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
11
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
12
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
13
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
14
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
15
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
16
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
17
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
18
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
19
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
20
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईबाबत दक्ष राहण्याचे आदेश

By admin | Updated: July 12, 2014 00:44 IST

वसमत : विभागीय आयुक्त संजीवकुमार जैस्वाल यांनी वसमत येथे गुरूवारी जिल्हास्तरीय आढावा बैठक घेतली. बैठकीत टंचाईसदृश्य परिस्थितीचा आढावा घेतला

वसमत : विभागीय आयुक्त संजीवकुमार जैस्वाल यांनी वसमत येथे गुरूवारी जिल्हास्तरीय आढावा बैठक घेतली. बैठकीत टंचाईसदृश्य परिस्थितीचा आढावा घेतला व आगामी काळात चाराटंचाई होणार नाही. याची खबरदारी घेण्याच्या व जिल्ह्यात वैरण विकास प्रकल्प राबवण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले.वसमत तहसील कार्यालयात गुरूवारी विभागीय आयुक्तांनी जिल्हास्तरीय आढावा बैठक घेतली. बैठकीस विभागीय आयुक्त संजीवकुमार जैस्वाल, उपायुक्त पापळकर, जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी पवार, जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उंबरकर, वन अधिकारी राठोड, उपविभागीय महसूल अधिकारी अनुराधा ढालकरी, तहसीलदार डॉ. अरविंद नरसीकर, गटविकास अधिकारी साहेबराव कांबळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्रीनिवास कोतवाल यांच्यांसह जिल्हाभरातील विविध खात्यांचे अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा मांडला. विभागीय आयुक्त संजीवकुमार जैस्वाल यांनी पाणीटंचाई, चाराटंचाई व दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू करा, चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर वैरण विकास प्रकल्प राबवा, अशा सूचना दिल्या. कृषी विभाग, वनविभाग व पशुसंवर्धन विभागाकडून चारा, बियाणांचे वाटप त्वरित करण्याचे आदेशही आयुक्तांनी यावेळी दिले.वसमत तहसील कार्यालयातील महिला कक्ष, माहिती कक्ष व रेकॉर्ड कक्षाचे उद्घाटन विभागीय आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन तहसीलदार अरविंद नर्सीकर यांनी केले. (वार्ताहर)अभिलेखा कक्ष पाहणी विभागीय आयुक्त संजीवकुमार जैस्वाल यांनी जिल्हास्तरीय बैठक घेऊन टंचाईसदृश्य परिस्थितीचा आढावा घेतलावसमत तहसील कार्यालयातील महिला कक्ष, माहिती कक्ष व रेकॉर्ड कक्षाचे उद्घाटन विभागीय आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.