शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
2
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
3
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
4
पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
5
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
6
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
7
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 
8
पत्नीला १७ वर्षांच्या मुलासोबत त्या अवस्थेत पाहिलं, पतीचं डोकं भडकलं, सिलेंडर उचलला आणि....
9
जगात भारी... Mumbai Indiansच्या जसप्रीत बुमराहने IPL मध्ये केला सर्वात 'जम्बो' विक्रम, 'हा' पराक्रम करणारा ठरला पहिलाच क्रिकेटर
10
चाललंय तरी काय? रोहित- विराटनंतर आणखी एका स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
11
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
12
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
13
Astrology: जून देणार 'या' पाच राशींच्या नशिबाला गती, येणार अच्छे दिन, बदलणार स्थिती!
14
IPL 2025 Final वरून मोठा राडा ! BCCI च्या निर्णयावर बंगाल सरकारचा घणाघाती आरोप
15
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
16
IPL 2025: शुभमन गिल- ऋषभ पंतमध्ये वाद सुरू? मैदानातील व्हिडीओ समोर आल्यानंतर चर्चांना उधाण
17
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
18
Shani Dosha: शनि महादशेचा त्रास तान्ह्या बाळांनाही होतो का? काय आहे त्यावर उपाय? जाणून घ्या!
19
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
20
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!

‘औरंगाबाद’च्या नामांतराला विरोध; पुन्हा एकदा कायदेशीर लढ्याचा निश्चय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 13:42 IST

यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला नावे बदलण्याशिवाय दुसरे काम नाही का? विकासकामे संपली का? अशा शब्दांत फटकारले होते.

औरंगाबाद : पर्यटनाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा निर्णय बुधवारी महाविकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. या निर्णयास मुस्लिम समाजाकडून कडाडून विरोध दर्शविण्यात आला. यापूर्वी सेना-भाजप युतीने नामांतरचा निर्णय घेतला होता. सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यासाठी लढा देण्यात आला होता. आता पुन्हा एकदा नामांतराची लढाई कायदेशीर मार्गानेच पुढे नेण्यात येणार असल्याचे मान्यवरांनी ‘लोकमत’शी बोलताना नमूद केले.

तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी १९९५ मध्ये औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय विधानसभेत घेतला. या निर्णयाला नामांतरविरोधी कृती समितीने खंडपीठात आव्हान दिले. याचिका फेटाळून लावण्यात आली होती. नंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. २००२ मध्ये याचिका निकाली काढण्यात आली. न्यायालयाने सरकारला नावे बदलण्याशिवाय दुसरे काम नाही का? विकासकामे संपली का? अशा शब्दांत फटकारले. २००१ मध्ये विलासराव देशमुख सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबादसंदर्भात काढलेली अधिसूचना मागे घेतली. आता महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतला. याला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दर्शविल्याबद्दल मुस्लिम समाजाकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

कायदेशीर लढा देणारचमुळात मंत्रिमंडळ बैठकीत धोरणात्मक निर्णय होत नाहीत. सभागृहात हा निर्णय कायद्याने घेणे अपेक्षित होते. मनोहर जाेशी यांनी सभागृहात निर्णय घेतला होता. सरकार कोसळण्याच्या मार्गावर असताना घाईगडबडीत हा निर्णय झाला आहे. याला आम्ही कायदेशीर मार्गानेच लढा देणार आहोत. आमच्या समितीची बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येईल.- मुश्ताक अहमद, माजी नगरसेवक

नामांतरासह पॅकेजही द्यायला हवे होतेशहराचे नाव बदलण्यात काहीच अर्थ नाही. संभाजीनगर नाव केल्यानंतर काही हजार कोटींचे पॅकेज तरी शहराला द्यायला हवे होते. ज्यामुळे शहराचा चेहरामोहरा तरी बदलता आला असता. मुळात औरंगजेब हे नाव नाही. नागरिकांनी दिलेले नाव होते. ‘औरंग’ या शब्दाचा अर्थ ‘तख्त’ बसण्याची जागा असा होतो. औरंगाबाद या नावाला काही ऐतिहासिक संदर्भ आहेत. मलिक अंबर यांनी शहर वसविले. त्यांचे नाव द्यायला काही हरकत नव्हती.- रशीद मामू, माजी महापौर

न्याय व्यवस्थेवर विश्वासशहराचे नाव बदलल्याने त्याचा इतिहास बदलत नाही. यापूर्वी माझ्या वडिलांसह मी न्यायालयीन लढाई लढलो. आमचा या देशाच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. संविधानाने आम्हाला जो अधिकार दिला आहे, त्या चौकटीत ही लढाई लढण्यात येईल.- खान अब्दुल मोईद हशर, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयMuslimमुस्लीम