शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं तीस-तीस घोटाळ्यात नाव? घोटाळ्याची माहिती ईडीने मागवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 13:24 IST

राज्यभर गाजलेल्या तीस- तीस घोटाळ्याशी संबंधित तीन डायऱ्या पोलिसांना सापडल्या होत्या.

औरंगाबाद: राज्यभर गाजलेल्या ३०-३० घोटाळ्याची माहिती ईडीने मागवली आहे. याच दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे नाव मुख्य आरोपीच्या डायरीत सापडल्याची माहिती आहे. या घोटाळ्यात आ. दानवे यांचे नाव आल्याने खळबळ उडाली आहे.

राज्यभर गाजलेल्या तीस- तीस घोटाळ्यात संतोष राठोड मुख्य आरोपी आहे. या घोटाळ्याशी संबंधित तीन डायऱ्या पोलिसांना सापडल्या होत्या. या डायऱ्यांमध्ये पैसे गुंतवणूक करणाऱ्या लोकांची नावे आहेत. यातील एका डायरीतील यादीत आ. अंबादास दानवे यांचे देखील नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी तीस-तीस घोटाळयाची कागदपत्रे ईडी ग्रामीण पोलिसांकड़ून नेली आहेत. यामुळे या घोटाळ्याची ईडीने चौकशी केली तर आ. दानवे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाचा आणखी एक नेता ईडीच्या रडारवर असल्याची चर्चा आहे. 

घोटाळ्यात अनेक राजकीय नेत्यांची नावतीसतीस घोटाळ्याच्या संबंधित डायरीत गुंतवणूकदारांची नावे आहेत. यात अनेक राजकीय नेत्यांची नावे असल्याची माहिती आहे. ज्यात एका मंत्र्याचा नातेवाईक, एक आमदार, एक डीवायएसपी, एक सहायक पोलीस निरीक्षक, चार पोलीस कर्मचारी, दहा शिक्षक, परभणी जिल्ह्यातील एक माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक, कन्नड तालुक्यातील एक नगरसेवक, औरंगाबाद जिल्ह्यातील दोन सरपंच (एक सरपंच पती), दोन माजी जिल्हा परिषद सदस्य, एक पंचायत समिती सदस्य, एक ग्रामपंचायत सदस्य, एक शासकीय कंत्राटदार, तीन वाळू व्यावसायिक, एक पोलीस पाटील, एका पक्षाचा जिल्हाध्यक्ष, पाटबंधारे विभागाचा एक अधिकारी, एक बँक कर्मचारी आणि चार हॉटेल चालक यांची नावं आहे. 

आ. अंबादास दानवे यांचा खुलासा तीस-तीस घोटाळ्यात आ. अंबादास दानवे यांच्या नावाची चर्चा समोर आली. याबाबत एका वृत्त वाहिनीने आ. दानवे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. 'त्या डायरीत माझं नाव नाही, कोणी दुसरा दानवे असेल.' असा खुलास दानवे यांनी केला आहे. 

काय आहे तीस-तीस घोटाळा.?मराठवाड्यात समृद्धी महामार्ग आणि डीएमआयसी या प्रकल्पांमुळे कोट्यवधी रुपयांचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला होता. हेच लक्षात घेत औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील संतोष राठोड नावाच्या तरुणाने या शेतकऱ्यांना माझ्याकडे पैसे गुंतवा आणि मासिक ३० टक्के परतावा मिळावा अशी योजना आणली. सुरवातीला काही नातेवाईकांना या योजनेत घेऊन त्यांना चांगला परतावा दिला. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी यात पैसा गुंतवला. यातून करोडेंची माया राठोडने जमा केली. मात्र, काही दिवसांनी राठोडने व्याज देणे बंद केले. त्यानंतर अनेकांनी गुंतवणूक परत मागितली तर पैसे देखील परत करण्यात आले नाही. यामुळे अखेर राठोड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय