भाजपविरुद्ध सर्वपक्षीय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:01 IST2017-08-24T01:01:50+5:302017-08-24T01:01:50+5:30
सदस्य संख्याबळानुसार जिल्हा परिषद गटातून जिल्हा नियोजन समितीवर १९ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

भाजपविरुद्ध सर्वपक्षीय!
राजेश भिसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सदस्य संख्याबळानुसार जिल्हा परिषद गटातून जिल्हा नियोजन समितीवर १९ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मात्र, नगर परिषद आणि नगर पंचायत गटासाठी सार्वमत न झाल्याने अखेर निवडणूक होऊन काँगे्रस, राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. भाजपच्या पाचही उमेदवारांचा पराभव झाला आहे. डीपीसीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना विरुद्ध भाजप असेच राजकीय चित्र आगामी काळात राहणार असल्याचे दिसून येते.
पालकमंत्री बबनराव लोणीकर, भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे, माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी जिल्हा नियोजन समितीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी पक्षीय सदस्य संख्याबळाचा फॉर्म्युला वापरण्यात आला. त्यानुसार या गटातून शिवसेना ५, राष्ट्रवादी काँग्रेस ५, काँग्रेस १ आणि भाजपच्या ८ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यातही भाजपला अनुसूचित जमाती प्रवर्गातील एक सदस्य अधिक दिल्याचे सूत्रांनी सांगितले. नगर परिषद गटात काँग्रेस ५६, राष्ट्रवादी काँग्रेस १८, शिवसेना १४ आणि भाजप ३६ असे संख्या बळ आहे. या संख्याबळानुसार एका जागेची मागणी भाजपकडून झाली. मात्र, यावर एकमत न झाल्याने भाजप सदस्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे या गटातून निवडणूक अटळ होती. तर नगर पंचायत गटातही राष्ट्रवादी काँग्रेस (पान ४ वर)