शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सत्तारांना संधी की भाजपचा विरोध? मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय शिरसाटांना मंत्रीपदाची हुलकावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 12:06 IST

सलग तीन टर्म आमदार असलेल्या शिरसाट यांना आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले नव्हते. हे त्यांच्या बंडखोरीचे एक कारण समजले जात होते.

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे म्हणून ओळखले जाणारे औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांचे नाव मंत्रिमंडळ विस्तारात ऐन वेळी कापले गेल्याने ते नाराज झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, अब्दुल सत्तारांना ऐनवेळी संधी की शहरात भाजपाला दुसरे शक्तीकेंद्र नको म्हणून विरोध झाल्याची शक्यता यामुळे शिरसाटांची मंत्रीपदाची संधी हुकली अशी चर्चा सुरु आहे.

शिरसाट यांनी नाराज नसल्याचे सांगितले असले तरी त्यांच्या कार्यालयात मंगळवारी मात्र शुकशुकाट दिसून आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेसोबत बंडखोरी करीत ४० आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले होते. यानंतर आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. या बंडखोर आमदारांमध्ये आ. शिरसाट हे अग्रभागी होते. बंडखोरीनंतर त्यांनी शिंदे यांचे नेतृत्व योग्य असल्याचे सांगून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भेटत नव्हते, आघाडी सरकारमध्ये असताना शिवसेनेच्या आमदारांना विकास निधी मिळत नव्हता. केवळ राष्ट्रवादीच्या लोकांनाच निधी देण्यात येत होता, अशी टीका केली होती. संजय राऊत यांच्यावरही ते जाहीर टीका करायचे. सलग तीन टर्म आमदार असलेल्या शिरसाट यांना आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले नव्हते. हे त्यांच्या बंडखोरीचे एक कारण समजले जात होते. 

एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जात असल्याने मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळेल, अशी सकाळपर्यंत शक्यता वर्तविली जात होती. शिरसाट यांनाही त्यांचा पत्ता कट होईल, असे वाटले नव्हते. यामुळे त्यांनी त्यांच्या कुटुंबाला काल मुंबईला बोलावून घेतले होते. सकाळी मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अचानक त्यांना मंत्रिपद मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले. एवढेच नव्हे तर टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या मुलींचे नाव आल्याने सत्तार यांचा पत्ता कट होईल आणि शिरसाट यांना मंत्री केले जाईल, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात होती. मात्र ऐन वेळी शिरसाट यांचे नाव नसल्याने ते नाराज झाल्याची चर्चा सुरू झाली. शिरसाटही प्रसारमाध्यमांशी बोलताना ते नाराज नसल्याचे म्हणाले. मात्र त्यांचे समर्थक नाराज झाले. कोकणवाडीतील त्यांच्या कार्यालयातही मंगळवारी शांतता पाहायला मिळाली.

समर्थकांमध्ये नाराजीमुख्यमंत्र्यांचे जवळचे असल्याने आ. शिरसाट यांचे मंत्रिपद पक्के असल्याची आशा त्यांच्या समर्थकांना होती. मंगळवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे समजताच त्यांचे अनेक समर्थक मुंबईला गेले होते. मात्र त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने समर्थकांमध्ये नाराजी पसरल्याचे बोलले जात आहे.

सत्तारांना संधी की भाजपचा विरोधमंत्रिमंडळात शिंदे गटाकडून पैठणचे संदिपान भुमरे आणि औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांचे नाव पक्के समजले जात होते. मात्र, सत्तार पहाटे मुख्यमंत्री शिंदे यांना भेटले आणि शपथविधीच्या काही तास आधी शिरासाटांचे नाव वगळले गेले अशी चर्चा आहे. यासोबतच शहरात भाजपला सावे मंत्रीपदी असताना दुसरे मंत्रिपद नको होते यामुळे त्यांच्याकडूनही शिरसाट यांना विरोध झाला असल्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटEknath Shindeएकनाथ शिंदेAbdul Sattarअब्दुल सत्तारBJPभाजपाAurangabadऔरंगाबादAtul Saveअतुल सावे