शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

केवळ संघच सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 05:17 IST

देशभरात सध्या असुरक्षितेचे वातावरण आहे. अल्पसंख्यांक, महिला, शेतकरी, कामगार, युवक, मीडिया सगळेच त्रस्त आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : देशभरात सध्या असुरक्षितेचे वातावरण आहे. अल्पसंख्यांक, महिला, शेतकरी, कामगार, युवक, मीडिया सगळेच त्रस्त आहेत. भाजपा सरकारमुळे देशात फक्त राष्टÑीय स्वयंसेवक संघच सुरक्षित आहे, अशी टीका राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केली.माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा शुभारंभ आझाद यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमास काँग्रेसचे महाराष्टÑ प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, खा. रजनी पाटील, माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, माजी आमदार, नगरसेवक उपस्थित होते.इंदिराजींच्या आठवणींना उजाळा देत, निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता लढण्यासाठी सज्ज राहाण्याचे आवाहन आझाद यांनी काँग्रेसजनांना केले.गांधीजींची टोपी ही स्वातंत्र्याची निशाणी आहे. आरएसएसची टोपी काळी आहे. सध्या देशावर काळ्या इंग्रजांचे राज्य चालू आहे. ते लुटण्यासाठीच आले आहेत, अशी टीका महाराष्टÑाचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी केली. या सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांचेही भाषण झाले.>भाजपाला ‘चले जाव’ म्हणण्याची वेळप्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण म्हणाले, ‘नुकताच ९ आॅगस्ट क्रांती दिन साजरा करण्यात आला. त्या वेळी इंग्रजांना ‘चले जाव’ म्हणावे लागले होते. आता भाजपाला ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आली आहे. आज इंदिराजींना बदनाम करण्याचा प्रयत्न चित्रपटाच्या माध्यमातूनसुद्धा होत आहे, पण तो पाहायला कुत्रंही गेलं नाही.महाराष्टÑात जाहीर केलेली शेतकºयांची कर्जमाफी कागदावरच असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. कर्जमाफी मिळाली का, असे त्यांनी विचारले असता, कुणीही हात वर केला नाही. सरकार फक्त जाहिराती देऊन भूलभुलैया करीत आहे, असे ते म्हणाले.ज्यांची डोकी स्वच्छ नाहीत, ज्यांचे विचार स्वच्छ नाहीत, ते भारत स्वच्छ करू शकत नाहीत. आपल्याकडे इंदिरा गांधींचा वैचारिक वारसा आहे. तो वारसा जपत, आपण खरेदी-विक्री संघ झालेल्या भाजपाला हुसकावून लावले पाहिजे. गुजरातमध्ये अहमद पटेल यांच्या विजयाने तशी सुरुवात झाल्याचे चव्हाण म्हणाले.शरद पवार ‘संपुआ’बरोबरचदिल्लीत झालेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीला राष्टÑवादीचे नेते शरद पवार अनुपस्थित होते, याकडे लक्ष वेधता, मी पवारांना त्या दिवशी फोनद्वारे संपर्क साधला होता, परंतु त्यांनी प्रकृती बरी नव्हती. त्यामुळेच ते येऊ शकले नाहीत; पण ते यूपीएबरोबरच आहेत, असर आझाद यांनी सांगितले.>आश्वासनांचा विसरकेंद्र सरकारचा कारभार टेलिव्हिजनच्या माध्यमातून सुरू आहे. मोदींना निवडणूक काळातील आश्वासनांचा विसर पडला आहे. देशभर गोरक्षकांचा धुमाकूळ सुरू आहे. नोटाबंदीमुळे कंबरडे मोडलेले असताना, जीएसटी आल्याने सर्वसामान्यांवर बोजा पडला, असेही आझाद म्हणाले.