केवळ ६० टक्केच खरीपाची पेरणी

By Admin | Updated: July 25, 2014 00:27 IST2014-07-24T23:47:20+5:302014-07-25T00:27:28+5:30

परभणी: जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात पडलेल्या पेरणीयोग्य पावसामुळे खरीप हंगामातील ३ लाख ८ हजार ४०० हेक्टरवर म्हणजे ५९.१२ टक्के पेरणी पूर्व झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली.

Only 60 percent sowing of Kharif | केवळ ६० टक्केच खरीपाची पेरणी

केवळ ६० टक्केच खरीपाची पेरणी

परभणी: जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात पडलेल्या पेरणीयोग्य पावसामुळे खरीप हंगामातील ३ लाख ८ हजार ४०० हेक्टरवर म्हणजे ५९.१२ टक्के पेरणी पूर्व झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली.
जिल्ह्याचे खरीप हंगामचे एकूण क्षेत्र ५ लाख २१ हजार ८०१ हेक्टर एवढे आहे. पावसाने जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दांडी मारल्याने केवळ १ लाख हेक्टरवरच पेरणी झाली होती. परंतु, जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात पावसाने जिल्ह्यात सर्वदूर पेरणीयोग्य पावसाने हजेरी लावली. यामुळे केवळ दहा दिवसात २ लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी योग्य झाली. यंदाही जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ५ लाख हेक्टरपर्यंत खरीपाची पेरणी पूर्ण होऊ शकते. परंतु, अद्यापही जिल्ह्यात मोठा पाऊस न झाल्याने पावसाने जर दांडी मारली तर ही पिके धोक्यात येऊ शकतात. परभणी जिल्ह्यात आतापर्यंत खरीप ज्वारी ९ हजार ३०० हेक्टर, बाजरी २ हजार ७०० हेक्टर, खरीप मका ८२४ हेक्टर, तूर २८ हजार ५०० हेक्टर, मूग १८ हजार ३०० हेक्टर, उडीद ४ हजार ७०० हेक्टर, तीळ ६०० हेक्टर, काऱ्हळ २०० हेक्टर, खरीप सूर्यफुल ३५ हेक्टर, सोयाबीन १ लाख २८ हजार (११६ टक्के), कापूस १ लाख ३८ हजार ६०० हेक्टर (६६ टक्के) असे एकूण ३ लाख ८ हजार ४०० हेक्टरवर खरीपाची पेरणी पूर्ण झाली आहे.
दमदार पावसाची आवश्यकता
जुलैचा शेवटचा महिना उलटला तरी जिल्ह्यातील नदी-नाल्यांना अद्यापही पाणी आले नाही. त्यामुळे तलाव व विहिरीच्या पाण्याची पातळी वाढली नाही. येत्या काही दिवसात मोठा पाऊस न झाल्यास ही सर्व पिके वाया जातील, अशी भिती व्यक्त होत आहे. यावर्षी अद्यापही मोठा पाऊस झाला नसल्याचे जनावरांच्या पिण्याचे पाणी व चाऱ्याचा प्रश्न मोठा बनला आहे.
सोयाबीन बियाणाच्या तक्रारीत वाढ
शेतकऱ्यांनी नामांकित कंपनीच्या सोयाबीन बियाणांची पेरणी केली होती. परंतु, बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. कृषी विभागाकडे सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारीत लक्षणीय वाढ झाली आहे.

Web Title: Only 60 percent sowing of Kharif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.