शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

२३पैकी फक्त ४ वाळूघाटांचाच लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:02 IST

जिल्ह्यात २३ वाळूघाटांची आॅनलाईन लिलाव प्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्यापैकी केवळ चार घाटच लिलावात गेले आहेत. उर्वरित घाटांसाठी पुन्हा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात २३ वाळूघाटांची आॅनलाईन लिलाव प्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्यापैकी केवळ चार घाटच लिलावात गेले आहेत. उर्वरित घाटांसाठी पुन्हा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.हिंगोली जिल्ह्यातील वाळूघाटांची कंत्राटदारांच्या स्पर्धेत किंमत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून आता अनेक घाट त्यांच्याही अवाक्याबाहेर गेले आहेत. यंदाही अशीच स्पर्धा झाली तर घाट बेभाव किमतीत घ्यावे लागतील, असे चित्र होते. मात्र तरीही तीन ते चारपट किमतीत घाट गेले आहेत. यामध्ये डिग्रस त.कोंढूर, कसबे धावंडा, नांदखेडा, पोटा खु. या घाटांचा समावेश आहे. या घाटांमुळे ७३ लाखांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे. या चार घाटांची प्राथमिक बोली पूर्ण झाली आहे. दुसºया टप्प्यातही ते कायम राहिल्यास पैसे भरून घेत हे घाट खुले करणे शक्य होणार आहे. मात्र सध्या बेभाव मिळणारी वाळू काही प्रमाणात का होईना कमी दराने मिळणार आहे. या घाटांतही दोन ते अडीच हजार रुपये ब्रासपर्यंत दर पडणार आहेत. काहींचे त्यापेक्षाही जास्त आहेत.तहसीलदारांनाच अधिकार!जे घाट लिलावात जाणार नाहीत. अशा ठिकाणावरून वाळू नेण्यासाठी नागरिकांना थेट तहसील कार्यालयात रॉयल्टी भरून वाळू नेण्याची बाब शासनाच्या विचाराधिन आहे. असे झाल्यास नागरिकांना भाड्याने वाहन लावून वाळू आणावी लागेल. मात्र थेट पैसे भरून वाळू आणल्याने गरजेच्या वेळी वाळूचा कंत्राटदार शोधत बसण्याची गरज राहणार नाही. शिवाय अनेक घाट न गेल्यामुळे या व्यवसायातील वाहनांचा आता खाजगी लोकांना भाड्याने उपयोग करून घेणेही शक्य होणार आहे. यात केवळ नफेखोरीने या व्यवसायात उतरलेल्यांना मात्र फटका बसू शकतो.