पोलिसांकडे केवळ २४ तक्रारी

By Admin | Updated: July 24, 2014 00:25 IST2014-07-23T23:48:39+5:302014-07-24T00:25:30+5:30

परभणी : दामदुप्पट, तिप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवित जिल्ह्यात अनेकांना गंडा घालणाऱ्या केबीसी मल्टीट्रेड प्रा. लि. या कंपनीच्या विरोधात पोलिस प्रशासनाकडे केवळ २४ तक्रारी आल्या आहेत.

Only 24 complaints to the police | पोलिसांकडे केवळ २४ तक्रारी

पोलिसांकडे केवळ २४ तक्रारी

परभणी : दामदुप्पट, तिप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवित जिल्ह्यात अनेकांना गंडा घालणाऱ्या केबीसी मल्टीट्रेड प्रा. लि. या कंपनीच्या विरोधात पोलिस प्रशासनाकडे केवळ २४ तक्रारी आल्या आहेत. या तक्रारीनुसार १६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न होत असले तरी जिल्ह्यातील गुंतवणुकीचा आकडा ५० कोटींच्यावर असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
चार वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या केबीसी कंपनीत अल्प मुदतीत दाम दुप्पट, तिप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखविण्यात आले. सुरुवातीला गुंतवणुकीचे छोेटे टप्पे होते. या टप्प्यात केलेल्या गुंतवणुकीचे लाभ कंपनीने सांगितल्याप्रमाणे ग्राहकांना मिळाले. त्यामुळे नागरिकांचा विश्वास संपादन करुन गुंतवणूक करणाऱ्यांचा ओघ वाढतच गेला. कंपनीकडून फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले असतानाही कंपनीविरुद्ध जिल्ह्यामधून आतापर्यंत केवळ एक गुन्हा कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे़ (प्रतिनिधी)
केबीसीमध्ये ५० कोटींची गुंतवणूक
केबीसी कंपनी जिल्ह्यामध्ये २०१० पासून कार्यरत आहे़ या कंपनीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे़ गुंतवणुकीचा हा आकडा ५० कोटींच्या वर असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे़ परंतु, गुंतवणूकदारांच्या तक्रारींचा ओघ मात्र कमी आहे़ पोलिस प्रशासनाकडे आतापर्यंत केवळ २४ तक्रारी दाखल झाल्या असून, त्यातून १६ लाख रुपये कंपनीत गुंतवल्याचे स्पष्ट होत आहे़ केबीसी कंपनीचे जाळे जिल्हाभर पसरलेले आहे़ प्रत्येक गावांत गुंतवणूकदार आहेत़ विशेष म्हणजे शेतकरी, शेतमजूरांबरोबरच प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर, सरकारी नोकरदार अशा सुशिक्षीत मंडळींनीही या कंपनीत गुंवणतूक केली आहे़ या प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक संदीप पाटील व अप्पर पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर, उपनिरीक्षक एस़ आऱ बडे करीत आहेत़
केबीसीविरोधी संघर्ष महासंघ
दरम्यान, परभणीत अखिल भारतीय केबीसी फसवणूक विरोधी संघर्ष महासंघ या संघटनेची स्थापना करण्यात आली. पदाधिकारी असे- अध्यक्ष- रंगनाथ चोपडे, काार्यध्यक्ष- हेमंत बामणीकर, सचिव- रुस्तुम महोरे, उपाध्यक्ष- गोविंद पवार, मुकुंद नंद, स. मुस्तफा स. फरीद, सुभाष गबाळे, श्रीरंग वाकळे, शैलेश टेहरे, अमोल जगताप, कैलास सुरवसे, कोषाध्यक्ष- गोविंद केंढे, संघटक- धोंडिराम पोटफोडे, सल्लागार- भागोजी धन्वे, भागुदास जोगदंड, श्रीरंग डाके, भगवान काळे, विजय जाधव.
परभणीत स्थापन झालेल्या संघर्ष समितीच्या माध्यमातून केबीसी कंपनीविरूद्ध कारवाईची मागणी होत आहे़

Web Title: Only 24 complaints to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.