शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

ऑनलाइन की ऑफलाइन ? नवीन शैक्षणिक वर्षाबाबत विद्यापीठाचे लक्ष शासनाच्या मार्गदर्शक सूचनांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 12:45 PM

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university News : पहिल्या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून अभ्यासक्रमांचे वर्ग-१ ऑक्टोबरपासून सुरू करणे अपेक्षित आहे.

ठळक मुद्देनवीन शैक्षणिक वर्षात कोणत्या पद्धतीने वर्ग घ्यावेत याबद्दल संभ्रम

औरंगाबाद : यूजीसीने यंदा विद्यापीठे व महाविद्यालयांचे नवीन शैक्षणिक वर्ष १ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मार्गदर्शक सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वर्ग ऑनलाइन घ्यायचे की ऑफलाइन, याबद्दल संभ्रम कायम असून, विद्यापीठाचे लक्ष शासनाच्या मार्गदर्शक सूचनांकडे लागलेले आहे. तथापि, यूजीसीच्या सूचना प्राप्त होण्यापूर्वीच विद्यापीठ प्रशासनाने नवीन शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. विद्यापीठ व महाविद्यालयीन वर्ग सुरू करण्याबाबतचे नियोजन करण्यासाठी २७ जुुलै रोजी विद्या परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली आहे, तर चालू शैक्षणिक वर्षातील उन्हाळी सत्राच्या सहामाही परीक्षेला २९ जुलैपासून प्रारंभ करण्याची तयारी विद्यापीठाने सुरू केली आहे. ( Online or offline? The University's attention to the government's guidelines regarding the new academic year ) 

सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी यूजीसीने जाहीर केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विद्यापीठे व महाविद्यालयीन पदवी- पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून अभ्यासक्रमांचे वर्ग-१ ऑक्टोबरपासून सुरू करणे अपेक्षित आहे. यूजीसीने म्हटले आहे की, यंदा नवीन शैक्षणिक वर्ष लवकर सुरू करण्यासाठी विद्यापीठ, महाविद्यालयांनी प्रयत्न करावा. कोरोनास्थितीचा विचार करून त्या परिसरातील विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन की ऑफलाइन शिक्षण द्यायचे, याचा निर्णय घ्यायचा आहे, असे असले तरी राज्यातील कोरोनाच्या सद्य:स्थितीनुसार राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच वर्ग सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय घ्यावा लागेल, असे विद्यापीठ सूत्रांचे म्हणणे आहे.

आमची तयारी आहे...१ ऑक्टोबरपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबतचे यूजीसीचे पत्र प्राप्त झाले आहे. आता आम्ही शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची वाट पाहत आहोत. नवीन शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करण्याबाबत आमची तयारी सुरू आहे. आम्ही चालू शैक्षणिक वर्षातील हिवाळी परीक्षा वेळेतच घेतल्या व निकालही घोषित केले आहेत. आता उन्हाळी परीक्षांचीही तयारी सुरू आहे. २७ जुलै रोजी विद्या परिषदेच्या बैठकीत नवीन शैक्षणिक वर्षाचे नियोजन केले जाणार आहे, असे यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षणStudentविद्यार्थी