ऑनलाइन की ऑफलाइन ? नवीन शैक्षणिक वर्षाबाबत विद्यापीठाचे लक्ष शासनाच्या मार्गदर्शक सूचनांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 12:45 PM2021-07-19T12:45:41+5:302021-07-19T12:48:49+5:30

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university News : पहिल्या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून अभ्यासक्रमांचे वर्ग-१ ऑक्टोबरपासून सुरू करणे अपेक्षित आहे.

Online or offline? The University's attention to the government's guidelines regarding the new academic year | ऑनलाइन की ऑफलाइन ? नवीन शैक्षणिक वर्षाबाबत विद्यापीठाचे लक्ष शासनाच्या मार्गदर्शक सूचनांकडे

ऑनलाइन की ऑफलाइन ? नवीन शैक्षणिक वर्षाबाबत विद्यापीठाचे लक्ष शासनाच्या मार्गदर्शक सूचनांकडे

googlenewsNext
ठळक मुद्देनवीन शैक्षणिक वर्षात कोणत्या पद्धतीने वर्ग घ्यावेत याबद्दल संभ्रम

औरंगाबाद : यूजीसीने यंदा विद्यापीठे व महाविद्यालयांचे नवीन शैक्षणिक वर्ष १ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मार्गदर्शक सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वर्ग ऑनलाइन घ्यायचे की ऑफलाइन, याबद्दल संभ्रम कायम असून, विद्यापीठाचे लक्ष शासनाच्या मार्गदर्शक सूचनांकडे लागलेले आहे. तथापि, यूजीसीच्या सूचना प्राप्त होण्यापूर्वीच विद्यापीठ प्रशासनाने नवीन शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. विद्यापीठ व महाविद्यालयीन वर्ग सुरू करण्याबाबतचे नियोजन करण्यासाठी २७ जुुलै रोजी विद्या परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली आहे, तर चालू शैक्षणिक वर्षातील उन्हाळी सत्राच्या सहामाही परीक्षेला २९ जुलैपासून प्रारंभ करण्याची तयारी विद्यापीठाने सुरू केली आहे. ( Online or offline? The University's attention to the government's guidelines regarding the new academic year ) 

सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी यूजीसीने जाहीर केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विद्यापीठे व महाविद्यालयीन पदवी- पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून अभ्यासक्रमांचे वर्ग-१ ऑक्टोबरपासून सुरू करणे अपेक्षित आहे. यूजीसीने म्हटले आहे की, यंदा नवीन शैक्षणिक वर्ष लवकर सुरू करण्यासाठी विद्यापीठ, महाविद्यालयांनी प्रयत्न करावा. कोरोनास्थितीचा विचार करून त्या परिसरातील विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन की ऑफलाइन शिक्षण द्यायचे, याचा निर्णय घ्यायचा आहे, असे असले तरी राज्यातील कोरोनाच्या सद्य:स्थितीनुसार राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच वर्ग सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय घ्यावा लागेल, असे विद्यापीठ सूत्रांचे म्हणणे आहे.

आमची तयारी आहे...
१ ऑक्टोबरपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबतचे यूजीसीचे पत्र प्राप्त झाले आहे. आता आम्ही शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची वाट पाहत आहोत. नवीन शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करण्याबाबत आमची तयारी सुरू आहे. आम्ही चालू शैक्षणिक वर्षातील हिवाळी परीक्षा वेळेतच घेतल्या व निकालही घोषित केले आहेत. आता उन्हाळी परीक्षांचीही तयारी सुरू आहे. २७ जुलै रोजी विद्या परिषदेच्या बैठकीत नवीन शैक्षणिक वर्षाचे नियोजन केले जाणार आहे, असे यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले.

Web Title: Online or offline? The University's attention to the government's guidelines regarding the new academic year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.