कांदा चाळीत अज्ञाताने खत टाकले; २०० क्विंटल कांदा सडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:03 IST2021-09-21T04:03:27+5:302021-09-21T04:03:27+5:30
कायगाव : भेंडाळा येथे एका शेतकऱ्याच्या कांदा चाळीत अज्ञात व्यक्तीने रासायनिक खत टाकल्याने २०० क्विंटल कांदा सडला. यात ...

कांदा चाळीत अज्ञाताने खत टाकले; २०० क्विंटल कांदा सडला
कायगाव : भेंडाळा येथे एका शेतकऱ्याच्या कांदा चाळीत अज्ञात व्यक्तीने रासायनिक खत टाकल्याने २०० क्विंटल कांदा सडला. यात सदर शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
भेंडाळा येथील गट क्रमांक ९८ मध्ये नितीन गोकूळ परभने यांनी कांद्याचे भाव वाढतील या आशेने शेतात कांदा चाळ तयार करून कांदा साठवून ठेवला होता. मात्र या कांदा चाळीत अज्ञात व्यक्तीने रासायनिक खतांचा शिडकाव केला. त्यामुळे चाळीतील तीन लाख रुपयांचा २०० क्विंटल कांदा सडला आहे. याबाबत नितीन परभने यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फोटो : भेंडाळा येथे अज्ञात व्यक्तीने कांदा चाळीत रासायनिक खत टाकल्याने सडलेला कांदा.
200921\1958-img-20210920-wa0010.jpg
भेंडाळा येथे अज्ञात व्यक्तीने कांदा चाळीत रासायनिक खत टाकल्याने शेतकऱ्याचा कांदा सडला आहे.