शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनेकडून शासनाला कांद्याचा अहेर

By admin | Updated: May 16, 2016 23:56 IST

हिंगोली : सरकारने कांदा उत्पादकांना उध्वस्त करणारे निर्णय घेतले असून कांद्याच्या निर्यातीवर शुल्क आकारणी करणारा निर्णय तातडीने रद्द करावा व राज्य सरकारने

हिंगोली : सरकारने कांदा उत्पादकांना उध्वस्त करणारे निर्णय घेतले असून कांद्याच्या निर्यातीवर शुल्क आकारणी करणारा निर्णय तातडीने रद्द करावा व राज्य सरकारने २० रूपये प्रति किलो दराने कांदा खरेदीसाठी केंद्र सुरू करावे, याासह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १६ मे रोजी शेतकरी संघटनेच्या वतीने आगळे-वेगळे आंदोलन करण्यात आले. हिंगोली येथे उपविभागीय महसूल अधिकारी राहुल खांदेभराड यांना कांद्याचा अहेर करण्यात आला. शेतकरी संघटना महिला आघाडीच्या माजी प्रदेशाध्यक्षा अंजलीताई अरूण पातूरकर, गयाबाई शेषराव राखोंडे, सत्यभामाबाई तुकाराम कऱ्हाळे, पद्माबाई खंडबाराव पोले, विमल नामदेव काळे, कौशल्याबाई उत्तमराव वाबळे, शिलाबाई प्रल्हाद राखोंडे, कौसल्याबाई उत्तमराव वाबळे, शीलाबाई प्रल्हाद राखोंडे, गीताबाई विठ्ठल वाबळे, ज्योती मुटकुळे यांनी हे आंदोलन केले. केंद्रीय कार्यकारिणी सदस्य ब.ल.तामसकर, देवीप्रसाद ढोबळे, उत्तमराव वाबळे, खंडबाराव नाईक, परबतराव माने, प्रल्हाद राखोंडे, खंडबाराव पोले, विठ्ठलराव वाबळे, बाळासाहेब वाबळे, संतोष वाबळे, शेषराव राखोंडे, अरूण पातूरकर, केशव ढोबळे, काशिनाथ जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यंदा कांद्याचे ठोक बाजारभाव प्रति किलो २ रूपयांपर्यंत खाली घसरले आहेत. कांद्याच्या निर्यातीवर शुल्क आकारणी करणारा तसेच कांदा खरेदीदारांवर साठ्याची मर्यादी घालणारा शासनाचा निर्णय कांदा उत्पादकांना उध्वस्त करणारा ठरत आहे. हा निर्णय तातडीने रद्द करून कांदा निर्यातीस प्रोत्साहन द्यावे, शेतकऱ्यांना तातडीने पीककर्जाच्या बोज्यातून मुक्तता करावी व आजपर्यंत शेतकऱ्यांच्या केलेल्या लुटीची रक्कम परत करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी दुपारी २ वाजता जिल्हा प्रशासनामार्फत शासनाला कांद्याचा आहेर देण्याचे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. शेतकरी संघटना, महिला आघाडी व शेतकरी युवा आघाडीतर्फे पुकारलेल्या या आंदोलनात जिल्हाभरातील कार्यकर्त्यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)