शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

सायकल दाखविली एक आणि पुरवठा केली दुसरीच

By admin | Updated: July 23, 2014 00:42 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने शहरातील ६१६ विद्यार्थिनींसाठी खरेदी केलेल्या सायकलींच्या गुणवत्तेवरून शिवसेनेतच दुफळी निर्माण झाली आहे.

औरंगाबाद : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने शहरातील ६१६ विद्यार्थिनींसाठी खरेदी केलेल्या सायकलींच्या गुणवत्तेवरून शिवसेनेतच दुफळी निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या सभापतीच्या काळात खरेदी केलेल्या सायकली भंगार असल्याचे कारण पुढे करून सभापती विजय वाघचौरे आणि सभागृह नेते किशोर नागरे यांनी सायकल वाटपाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला, तर प्रशासनाने सायकलींची गुणवत्ता एकदम चांगली असल्याचा दावा करीत मनपा शाळेतील विद्यार्थिनींना सायकलींचे धूमधडाक्यात वाटप करून सगळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. महापौर कला ओझा, सभापती कमल नरोटे, विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड, उपायुक्त रवींद्र निकम यांच्या उपस्थितीत सायकल वाटपाचा कार्यक्रम पार पडला. भंगार सायकलींचा पुरवठा अहमदनगर येथील संजय ट्रेडर्स या संस्थेने हिप्पो या कंपनीच्या सायकली पुरविल्या आहेत. ३ हजार ८३१ रुपयांना हिप्पो या कंपनीची लेडीज सायकल कंपनीच्या वेबसाईटवर पाहिली तर ती सायकल वेगळी आहे, पालिकेस पुरवठा केलेली सायकल वेगळी आहे. फोर्क बास्केट, मर्डगार्ड, स्टॅण्ड, बे्रक्स, साडीगार्ड या वस्तू सायकलीला दिसत नाहीत. शिवाय स्टीलचे मटेरियल सायकलीमध्ये कमी प्रमाणात आहे. त्यामुळे ती सायकल ३ हजार ८३१ रुपयांची नसून ती २३०० रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात ३६०० रुपयांना बॅ्रण्डेड लेडीज सायकल मिळते.उपायुक्तांनी दिलेल्या प्रश्नांची उत्तरेउपायुक्त रवींद्र निकम यांना सायकल खरेदीप्रकरणी विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे त्यांनी अशी दिली.निविदा कधी काढल्या?- डिसेंबर २०१३ मध्ये किती निविदा आल्या?- औरंगाबादच्या यश, नाझ ट्रेडिंग व अहमदनगरच्या संजय ट्रेडिंग अशा तीन पुरवठादारांच्या निविदा आल्या. कुणी किती रक्कम टाकली?- यश व नाझ ट्रेडिंगने ४५०० तर संजय ट्रेडिंगने ३ हजार ९०९ रुपयांची निविदा भरली. संजय ट्रेडिंगने २ टक्के दर कमी केल्याने रेट कॉन्ट्रक्टनुसार खरेदी केली.बाजारात चौकशी केली होती का?- हो, माझ्या माणसाला पाठवून इतर कंपनीच्या सायकलींचे दर बाजारातून मिळविले होते.सायकल फिटिंग करणारे म्हणतात २३०० रुपयांची सायकल आहे?- ते काहीही सांगतील, मी काय बोलणार त्यांच्या सांगण्यावर. शिलाई मशीन, सायकलींचा पुरवठादार एकच कसा- रेट कॉन्ट्रक्टवर खरेदी केली आहे, योगायोग असेल तो फक्त. गुणवत्ता पाहिली होती का- कंत्राटदारांना वेळेवर पेमेंट मिळत नाही. म्हणून सगळी तडजोड करावी लागते.