शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

एक प्लॉट तिघांना विकला

By admin | Updated: May 22, 2014 00:30 IST

मुखेड : तालुक्यातील जांब बु़ येथील एका शिक्षकाचे प्लॉट जुन्या मालकाने खोटे दस्तावेज तयार करून तिघांना विक्री केल्याची घटना घडली

मुखेड : तालुक्यातील जांब बु़ येथील एका शिक्षकाचे प्लॉट जुन्या मालकाने खोटे दस्तावेज तयार करून तिघांना विक्री केल्याची घटना घडली असून फिर्यादी शिक्षकाने दाखल केलेल्या याचिकेच्या आधारावर न्यायालयाने आरोपीसह इतर सात जणांंविरूद्ध मुखेड पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असता मुखेड पोलिसांनी आरोपीविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़ याबाबतची माहिती अशी की, जांब येथे माधव दिगंबर शिंदे यांची गट क्ऱ४३७ मध्ये जमीन आहे़ यातील प्लॉट क्ऱ५ व ६ हे दोन भूखंड शिंदे यांनी २००४ रोजी ५० हजार रुपये दराने रमेश काशीनाथ धनुरे यांना विक्री केले व सदर प्लॉट धनुरे यांच्या नावे रितसर करून दिले़ धनुरे यांनी शिंदे यांच्याकडून विक्री केलेले प्लॉट सन २००७ मध्ये (प्लॉट क्ऱ५) बालाजी गोविंदराव राऊतवाड यांना विक्री केले़ राऊतवाड यांनी धनुरे यांच्याकडून खरेदी केलेले भूखंड क्षेत्रफळ १३०० चौफ़ुट रितसर खरेदीखत करून ग्रामपंचायतमध्ये स्वत:च्या नावे लावले़ ग्रामपंचायतने गट क्ऱ४३७ मधील प्लॉट क्ऱ५ हा बालाजी राऊतवाड यांचे नावे लावून त्यांना घर क्ऱ१०२० असा दिला असताना पूर्वाश्रमीचे भूखंड मालक माधव शिंदे यांनी जुन्या कागदपत्राअधारे व भूखंडाचे चुकीचे क्षेत्रफळ दाखवून प्लॉट क्ऱ५ मधील २० बाय ३२ चौफ़ुट जमीन दि़१जुलै २०१३ रोजी जांब येथील खैरुनिसा बेगम अब्दुल रज्जाक यांना विक्री केली तसेच यातील १० बाय ३२ चौफ़ुट जमीन ८ जानेवारी २०१४ रोजी हणमंत शंकर ताटफळे यांना विक्री केली व मुखेडच्या उपनिबंधक कार्यालयात खोट्या दस्तावेजाद्वारे खरेदीखत करून दिले़ ही बाब मुळमालक राऊलवाड यांच्या लक्षात आल्यानंतर राऊलवाड यांनी शिंदे यांनी खोट्या दस्तावेजाद्वारे माझ्या मालकीचे प्लॉट विक्री करून फसवणूक केल्याची तक्रार मुखेड पोलिसात दाखल केली होती़ पण मुखेड पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने फिर्यादीने न्यायालयात धाव घेतली़ न्यायालयाने या प्रकरणातील प्लॉटचे दस्तावेज व पुरावे तपासून आरोपी माधव शिंदे यांच्यासह शिंदे यांना सहकार्य केल्याप्रकरणी हणमंत ताटफळे, खैरुनिसाबेगम अब्दुल रज्जाक, अप्पाराव नळगे, शंकर ताटफळे, ननुसाब मुजावर, शेख मियाँसाब नासर शेख (सर्व रा़जांब बु़) यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुखेड न्यायालयाचे न्यायाधीश एजाज महमंद यांनी मुखेड पोलिसांना दिले असून मुखेड पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे़ या प्रकरणी फिर्यादीच्या बाजुने अ‍ॅड़ हणमंत अस्पतवाड, अ‍ॅड़सोनटक्के यांनी काम पाहिले़ या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक एस़एस़ शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक चव्हाण करीत आहेत़ (वार्ताहर)