शेतीच्या वादातून एकाचा खून
By Admin | Updated: January 18, 2015 00:29 IST2015-01-18T00:25:44+5:302015-01-18T00:29:14+5:30
लोहारा : मळेगाव येथील व्यंकट एकंबे यांचा खून त्यांच्याच मावस भावाने केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे़ मामाची खरेदी केलेली जमीन परत करण्याचा

शेतीच्या वादातून एकाचा खून
लोहारा : मळेगाव येथील व्यंकट एकंबे यांचा खून त्यांच्याच मावस भावाने केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे़ मामाची खरेदी केलेली जमीन परत करण्याचा तगादा लावल्याने मावस भावानेच रूमण्याने डोक्यात मारहाण करीत व्यंकट यांचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले़
लोहारा- जेवळी मार्गाच्या कडेला शुक्रवारी माळेगाव येथील व्यंकट एकंबे (वय-४८) यांचा मृतदेह आढळून आला होता़ रूक्मिणबाई एकंबे यांच्या फिर्यादीवरून लोहारा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता़ पोलिसांनी पाचरण केलेल्या श्वानाने मोघा खुर्दपर्यंत माग काढल्यानंतर मयताचा मावस भाऊ गणेश गोरे याला संशयीत म्हणून त्याब्यात घेतले़ गोरेला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने घडलेला प्रकाराची कबुली देत व्यंकट एकंबे यांचा काटा काढल्याची माहिती दिली़
माळेगाव येथील व्यंकट एकंबे यांचे मामा बिभीषण पवार (रा़वडगाव गांजा) मोघा खुर्द येथील गणेश गोरे यांना जमीन खरेदीखत करून देत ४० हजार रूपये घेतले होते़ मामांनी काही वर्षानंतर पैसे देवून गणेश याला जमीन परत मागितली़ गणेश मामाला जमीन देत नसल्याने व्यंकट यांनी गणेशकडे मामाला जमीन परत दे म्हणून मागणी लावून धरली होती़ याचाच राग मनात धरून गणेश याने व्यंकट यांच्या डोक्यात रूमण्याने मारून खून केला असल्याचे पोलिसांनी सांगितले़