शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

एक लाख रुपये चोरणाऱ्याला सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 11:26 PM

निजामाबाद-पुणे रेल्वेतील प्रवाशाच्या पँटच्या चोर खिशातून एक लाख रुपये चोरणारा केशव चंदू निखाते याला गुरुवारी (दि.४ जुलै) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. एच. जोशी यांनी सहा महिने सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला.

औरंगाबाद : निजामाबाद-पुणे रेल्वेतील प्रवाशाच्या पँटच्या चोर खिशातून एक लाख रुपये चोरणारा केशव चंदू निखाते याला गुरुवारी (दि.४ जुलै) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. एच. जोशी यांनी सहा महिने सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला.यासंदर्भात व्यंकटेश्वर रामकिसन बेजमवार (रा. निजामबाद) यांनी फिर्याद दिली होती की, १४ सप्टेंबर १०१४ रोजी ते आणि त्यांचा मित्र औरंगाबादला येण्यासाठी निजामाबाद-पुणे रेल्वेत बसले होते. फिर्यादीला औरंगाबाद येथील सिडको परिसरात औषधी दुकान सुरू करायचे होते म्हणून त्यांनी आपल्यासोबत एक लाख रुपये रोख घेतले होते व ते पँटच्या चोर खिशात ठेवले होते. प्रवासात त्यांना झोप लागली. मुखेडहून एक व्यक्ती फिर्यादीच्या वरच्या बर्थवर बसला होता, तर अन्य दोन व्यक्ती फिर्यादीच्या बाजूच्या बर्थवर बसले होते. परभणी-पूर्णादरम्यान फिर्यादीला जाग आली असता, त्याने खिसा चाचपडून पाहिला असता, पैसे नसल्याचे लक्षात आले. पैशांची चोरी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी तक्रार दिल्यावरून नांदेड लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.तपासादरम्यान आरोपी केशव चंदू निखाते (४०, रा. शाहूनगर, वाघाळा, नांदेड) याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने चोरी केल्याची कबुली दिली व स्वत:च्या घरातून चोरीचे ७० हजार रुपये काढून दिले. खटल्याच्या सुनावणीच्या वेळी, सहायक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३७९ अन्वये वरीलप्रमाणे शिक्षा व दंड ठोठावला.----------

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCourtन्यायालय