भरधाव चारचाकी - दुचाकीच्या अपघातात एक ठार, तीन जखमी
By साहेबराव हिवराळे | Updated: October 20, 2023 13:06 IST2023-10-20T13:06:32+5:302023-10-20T13:06:53+5:30
दुचाकीला धडक देणारी चारचाकी ही जय सेवालाल टूर्स अँड ट्रॅव्हल्सची असल्याची माहिती मिळत आहे.

भरधाव चारचाकी - दुचाकीच्या अपघातात एक ठार, तीन जखमी
पिंप्रीराजा : चित्तेगाव - पिंप्रीराजाकडे भरधाव वेगात ओव्हरटेक करणाऱ्या चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एक ठार तर तीन गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.
हारसिंग शिवलाल ब्राह्मणावत (६७, रा. हुसेनपूर) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. एमएच २० - बीडी ८७२८ या क्रमांकाच्या चार चाकी वाहनाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला (क्र. एमएच २० - बीई १४३८) जोरदार धडक दिल्याने हरसिंग हे ठार झाले. तर या अपघातात त्यांची मुलगी कांचन पन्नालाल बिघोत (४५) (रा. हानोबाची वाडी, ता. पैठण) व नात पायल अर्जुन गुसिंगे (२३, मुराबाद बांडवाडी) जखमी झाल्या. या अपघातात पायल गुशिंगे यांची १ वर्षाची मुलगी प्रीयल गुशींगे हीदेखील जखमी झाली. हा अपघात गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास मुलीला खाजगी दवाखान्यात नेत असताना घडला. दुचाकीला धडक देणारी चारचाकी ही जय सेवालाल टूर्स अँड ट्रॅव्हल्सची असल्याची माहिती मिळत आहे.