जीप उलटल्याने एकाचा मृत्यू

By Admin | Updated: May 15, 2014 00:28 IST2014-05-15T00:13:08+5:302014-05-15T00:28:25+5:30

वाळूज महानगर : पुण्याहून औरंगाबादकडे भरधाव वेगाने येणारी सुमो जीपचालकाचे नियंत्रण सुटून उलटल्यामुळे एकाचा मृत्यू, तर चालकासह चौघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज पहाटे जिकठाण फाट्यावर घडली.

One killed by jeep reversed | जीप उलटल्याने एकाचा मृत्यू

जीप उलटल्याने एकाचा मृत्यू

वाळूज महानगर : पुण्याहून औरंगाबादकडे भरधाव वेगाने येणारी सुमो जीपचालकाचे नियंत्रण सुटून उलटल्यामुळे एकाचा मृत्यू, तर चालकासह चौघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज पहाटे जिकठाण फाट्यावर घडली. औरंगाबाद येथील आयटीआयचे कर्मचारी टाटा सुमो जीप (क्र. एमएच-४४, बी-२८४९) मध्ये मुंबईहून पुणेमार्गे औरंगाबादकडे येत होते. जिकठाण फाट्यावर आज (१४ मे रोजी) पहाटे ५ वाजेच्या सुमारास जीपचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ही जीप रोडच्या खाली जाऊन उलटली. या अपघातात टाटा सुमोमधील हर्षवर्धन बाहुबली शहा (५२, रा. परभणी) हा गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच ठार झाला. दरम्यान, याच मार्गावर वाळूज पोलीस ठाण्याचे पोहेकॉ. नंदकुमार आव्हाळे, पोकॉ. अमजद पटेल, पोकॉ. लोखंडे, वाहनचालक खंडागळे हे रात्रीची गस्त घालत असताना त्यांना या अपघाताची माहिती मिळाली. पथकाने अपघातस्थळी धाव घेऊन जीपमधील चालक दादाराव जोखाजी जाधव (५८, रा. पवनगर, सिडको) तसेच प्रवासी आर.आर. आंबेकर, ए.यू. उसळे, नागरे (सर्व रा. औरंगाबाद) यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल केले. भरधाव वेगाने येत असताना जीपचालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी पोहेकॉ. नंदुकमार आव्हाळे यांच्या तक्रारीवरून जीपचालक दादाराव जाधव याच्याविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संजय निकुंभ करीत आहेत. अपघात सत्र सुरूच वाळूज परिसरात गत चार दिवसांपासून अपघाताचे सत्र सुरूच आहे. विविध चार अपघातांत पाच जण ठार झाले असून, आठ जण जखमी झाले आहेत. ११ मे रोजी मुंबई- नागपूर हायवेवर खोजेवाडी शिवारात बीअर घेऊन जाणार्‍या ट्रकने पाठीमागून दुचाकीला जोराची धडक दिल्यामुळे किशोर जाधव व आकाश जाधव (रा. नागरे बाभूळगाव, ता. गंगापूर) या दोघा पिता-पुत्राचा मृत्यू झाला होता, तर संगीता जाधव व एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला होता. याच महामार्गावर १२ मे रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास शिर्डीहून लग्न समारंभ उरकून औरंगाबादकडे येणारी कार टेम्पोवर पाठीमागून धडकली होती. या अपघातात पवन राठी हा ठार झाला असून, कारमधील प्रा. नंदकिशोर राठी, गीता राठी, कमल खटोड हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. काल १३ मे रोजी कामगार चौकात अज्ञात ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे गणेश पुंडलिक भोकरे हा ठार झाला होता, तर गजानंद काकडे हा जखमी झाला होता. गेल्या चार दिवसांत वेगवेगळ्या अपघातांत आतापर्यंत पाच जणांना आपला प्राण गमवावा लागला असून, आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात सत्र थांबत नसल्यामुळे ये-जा करणार्‍या वाहनधारक व नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: One killed by jeep reversed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.