शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याने बळीराजाचा केला वांदा

By admin | Updated: May 22, 2014 00:31 IST

रामेश्वर काकडे , नांदेड जिल्ह्यासह परजिल्ह्यातून नवा कांदा मोठ्या प्रमाणात नांदेड बाजारपेठेत दाखल झाल्याने बुधवारी लिलावात कांद्याचे दर ३०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलवर होते.

रामेश्वर काकडे , नांदेड जिल्ह्यासह परजिल्ह्यातून नवा कांदा मोठ्या प्रमाणात नांदेड बाजारपेठेत दाखल झाल्याने बुधवारी लिलावात कांद्याचे दर ३०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलवर होते. अधिच गारपिटीने झोडपलेल्या उत्पादकांना पुन्हा कांद्याने रडवले आहे. शहरातील बाजारात जिल्ह्याच्या विविध भागासह हिंगोली, परभणी, लासलगाव, नाशिक, पिंपगाव, बसवंत, सोलापूर, अहमदनगर, आंध्रा, कर्नाटक आदी ठिकाणाहून कांदा दाखल होत आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने उन्हामुळे कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे प्रत्येक शेतकरी नवा कांदा काढल्यानंतर त्याची साठवणूक न करता तो थेट विक्रीसाठी आणत आहे. नांदेडच्या बाजारात आठवड्यात ४० ते ५० गाड्या कांदा दाखल होत असल्यामुळे प्रतिक्विंटल दर ३०० ते ७०० रुपयावर आले आहेत. शेतकर्‍यांनी उत्पादनासाठी टाकलेला खर्च, वाहतुकीसाठी केलेला खर्च जास्त अन् उत्पादन कमी या तफावतीमुळे शेतकरी पूरता हवालदिल झाला आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे भाव ६ रुपयापासून १२ रुपयापर्यंत आहेत. गतवर्षी कांद्याचे भाव प्रतिकिलो ६० ते ७० रुपयावर जाऊन ठेपले होते. परिणामी अनेक हॉटेल, भोजनालयातून कांदा हद्दपार झाला होता. दर कमी झाल्याने कांदा खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे. सर्वच भागात एकाच वेळी नवा कांदा काढणीस प्रारंभ झाल्याने भाव घसरत आहेत. केवळ चांगल्या प्रतीच्या कांद्यालाच ६०० रुपयापर्यंत भाव मिळत आहे. ज्यावेळेस शेतकर्‍यांकडील कांदा संपतो त्यावेळी मात्र बाजारातील भाव गगनाला भिडतात. परंतु शेतकर्‍यांकडील कादां बाजारात दाखल झाल्यानंतर मात्र त्यांना फुकटभाव विक्री करावी लागते. कांद्यांचे उत्पादन शेतकरी घेत असले तरी दर ठरविण्याचा अधिकार मात्र त्यांना नाही. उत्पादित कांद्याची साठवणूक करण्यासाठी आधुनिक कांदाचाळ नसल्याने काढलेला कांदा, थेट बाजारात आणून विक्री करावा लागतो. एका एकरामध्ये ४० हजार रुपयाचे स्प्रिंक्लर बसविले असून बियाणे व इतर यासाठी ४२ हजार असा एकूण ८२ हजार रुपये खर्च केला. मात्र दर कमी झाल्याने यातून केवळ २० हजाराचे उत्पन्न मिळाले. यासाठी शासनाने शेतकर्‍यांना आधुनिक कांदाचाळ उभारणीसाठी सहाय्य करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया कळमनुरी तालुक्यातील झुंझुणवाडी येथील शेतकरी गोविंद जाधव यांनी दिली़ तर एका एकरात कांदा लागवडीसाठी मला १६ हजार रुपये खर्च झाला. तर उत्पन्न १२ हजार रुपये मिळाले. यातून कांद्यासाठी टाकलेला उत्पादन खर्चही निघाला नसल्याचे कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील शेतकरी भागोराव हाके यांनी सांगितले़