ओमायक्रॉनची धास्ती ! औरंगाबादेत विदेशातून आलेल्या १८ जणांची आरटीपीसीआर; कर्नाटकातून येणाऱ्या वाहनांवर नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 14:18 IST2021-12-03T14:14:28+5:302021-12-03T14:18:48+5:30

Omicron Variant Scare : कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचे रुग्ण शेजारच्या कर्नाटक राज्यात आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने धास्ती घेतली आहे.

Omicron Variant scare ! RTPCR of 18 immigrants in Aurangabad; eye on vehicles coming from Karnataka | ओमायक्रॉनची धास्ती ! औरंगाबादेत विदेशातून आलेल्या १८ जणांची आरटीपीसीआर; कर्नाटकातून येणाऱ्या वाहनांवर नजर

ओमायक्रॉनची धास्ती ! औरंगाबादेत विदेशातून आलेल्या १८ जणांची आरटीपीसीआर; कर्नाटकातून येणाऱ्या वाहनांवर नजर

औरंगाबाद : कोरोनाच्या ( Corona Virus In Aurangabad ) ओमायक्रॉन विषाणूची धास्ती (Omicron Variant ) प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे १५ दिवसांत विदेशातून शहरात परतलेल्या २४ नागरिकांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यांपैकी दोघांची यापूर्वीच चाचणी केलेली आहे. गुरुवारी १८ जणांची विविध आरोग्य केंद्रात आरटीपीसीआर करण्यात आली ( RTPCR of 18 immigrants in Aurangabad ). तिघे बाहेरगावी गेले असून एकजण आज, शुक्रवारी चाचणी करणार आहे.

दरम्यान, कर्नाटककडून औरंगाबादकडे येणाऱ्या वाहनांवर प्रशासनाने नजर ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचे रुग्ण शेजारच्या कर्नाटक राज्यात आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने धास्ती घेतली असून, बाहेरगावाहून विमानाने किंवा रेल्वेने येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी केली जाणार आहे. गेल्या १५ दिवसांत विदेशातून शहरात आलेल्या ३२ जणांपैकी २२ जण हे शहरातील रहिवासी आहेत. या नागरिकांची यादी जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त होताच महापालिकेने तातडीने या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. या सर्वांशी आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मोबाईलवरून संपर्क साधून त्यांना आरोग्य केंद्रात बोलावले. २२ पैकी १८ जणांची कोरोनाची आरटीपीसीआर करण्यात आली. तिचा अहवाल शुक्रवारी प्राप्त होईल. यापूर्वी दोन विदेशी नागरिकांची चाचणी करण्यात येऊन त्यांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे.

सोलापूर-धुळेवरून औरंगाबादकडे
कर्नाटकमधील विजापूरमार्गे सोलापूर ते धुळे या महामार्गावरून येणारी वाहने औरंगाबादमार्गे जात आहेत. सोलापूर चेकपोस्टवर या वाहनांतील प्रवाशांचे स्क्रीनिंग होत आहे की नाही, याची माहिती जिल्हा प्रशासन घेत आहे. तसेच महामार्गावर कुठेही टोलनाक्यावर वाहन थांबत नाही; कारण फास्टटॅगमुळे बहुतांश वाहने सुसाट पुढे जात आहेत. शहरात ते कुठे थांबत आहेत की नाही, याची खातरजमा अद्याप होत नाही. त्यामुळे कर्नाटककडून येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याबाबत आज, शुक्रवारी निर्णय होणे शक्य आहे.

Web Title: Omicron Variant scare ! RTPCR of 18 immigrants in Aurangabad; eye on vehicles coming from Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.