लय भारी! ‘राखी’त मेड इन छत्रपती संभाजीनगर; कुंकू,अक्षदासोबत राखीची पॅकिंग

By प्रशांत तेलवाडकर | Published: July 22, 2023 05:46 PM2023-07-22T17:46:42+5:302023-07-22T17:55:42+5:30

सुंदर पॅकिंगमधील राख्यांचे डिझाईनही तेवढेच आकर्षक ठरत आहे; महिनाभर आधीच बनल्या १ कोटीच्या राख्या

Oh wow! 'Rakhi' made in Chhatrapati Sambhajinagar; Rakhyas worth 1 crore have already been made in a month | लय भारी! ‘राखी’त मेड इन छत्रपती संभाजीनगर; कुंकू,अक्षदासोबत राखीची पॅकिंग

लय भारी! ‘राखी’त मेड इन छत्रपती संभाजीनगर; कुंकू,अक्षदासोबत राखीची पॅकिंग

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : भावा-बहिणीचे अतूट नाते, स्नेह आणखी दृढ करणारा ‘राखी पौर्णिमा’ सण महिनाभरावर येऊन ठेपला आहे. विशेष म्हणजे ‘राखी’त यंदा ‘मेड इन छत्रपती संभाजीनगर’ ब्रँड बनला असून सुमारे १ कोटीच्या राख्या होलसेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.

५० महिला बनविताहेत राखी
शहरातील ५० महिला राखी बनविण्यात एक्स्पर्ट झाल्या आहेत. यात पद्मपुरा, राहुलनगर, बजाजनगर येथील या महिला आहेत. मागील वर्षभरापासून त्या राखी बनवत आहे. मोती, खडे, डायमंडच्या नाजूक राख्या बनविण्यात त्यांनी ‘मेड इन छत्रपती संभाजीनगर’ची छाप निर्माण केली आहे.

एक महिला बनविते १२ डझन राखी
मागील ५ वर्षांपासून ५० महिला राखी बनवित असून. प्रत्येक महिला दिवसभरात १२ डझन राखी तयार करीत आहे. राखी बनविणे सोपे नसून अत्यंत नाजूक काम असून, एक-एक मणी, डायमंड धाग्यात विणावा लागतो.

१५०० डिझाईनच्या राख्या
राखी डिझाईनर सविता गुगळे यांनी सांगितले की, शहरात यंदा १५०० डिझाईनच्या राख्या तयार करण्यात आल्या आहेत. यात फॅन्सी राख्यांचा समावेश आहे. ओरिजनल चंदन राखी, रुद्राक्ष राखी, कौडी राखी, मुलीधागा राखी, मोती राखी, गोल्ड व सिल्व्हर प्लेटेड राखी, जरदोजी, रेशीम राखी, सुती राखी, लुंबा राखीचा समावेश आहे.

आता राखीसोबत कुंकू व अक्षदाही
यंदा राखीसोबत कुंकू व अक्षदाही देण्यात आल्या आहेत. यासाठी खास छोट्या डब्यांची व्यवस्था बॉक्समध्ये करण्यात आली आहे. अशा राख्यांना महिलांकडून मागणी असून बाहेरगावी किंवा विदेशात ज्यांचे भाऊ आहेत त्यांना अशा राख्या पाठविल्या जात आहेत.

चिमुकल्यांसाठी प्रोजेक्टर राखी
चिमुकल्यांसाठी यंदा प्रोजेक्टर राखी आली आहे. घड्याळासारख्या खेळणीचा खुबीने वापर राखीत करण्यात आला आहे. बटण दाबताच राखीतील प्रोजेक्टरद्वारे भिंतीवर चित्र दिसू लागते. याशिवाय टीव्ही चॅनलवरील कार्टून मालिकेतील बहुतांश पात्र राखीवर दिसत आहे. याशिवाय लाईटिंग, म्युझिक व स्पिनरच्या राख्याही बच्चे कंपनीत प्रिय होतील.

Web Title: Oh wow! 'Rakhi' made in Chhatrapati Sambhajinagar; Rakhyas worth 1 crore have already been made in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.