शहरं
Join us  
Trending Stories
1
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
3
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
4
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
5
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
6
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
7
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
8
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
9
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
10
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
11
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
12
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
13
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
14
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
15
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
16
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
17
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
18
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
19
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
20
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी रिकाम्या हातानेच परतले

By admin | Updated: June 25, 2014 00:40 IST

कुरूंदा : वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे दोन वर्षापुर्वी घडलेल्या सांगाडा प्रकरणातील ‘डीएनए’ अहवाल आणण्यासाठी मुंबईला गेलेले पोलिस उपनिरीक्षक अशोक जोंधळे रिकाम्या हाती परत आले आहेत.

कुरूंदा : वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे दोन वर्षापुर्वी घडलेल्या सांगाडा प्रकरणातील ‘डीएनए’ अहवाल आणण्यासाठी मुंबईला गेलेले पोलिस उपनिरीक्षक अशोक जोंधळे रिकाम्या हाती परत आले आहेत. त्यामुळे या गंभीर गुन्ह्याच्या तपासामध्ये मोठी अडचण निर्माण झाली आहे.
कुरूंदा येथील जि. प. हायस्कुल जवळ एका पाण्याच्या कोरड्या टाकीत दोन मानवी सांगाडे आढळले होते. या सांगाड्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी ‘डीएनए’ चाचणीसाठी सांगाड्यांचे अवशेष पाठविले होते. दोन वर्षापासून डीएनए अहवाल प्राप्त होत नसल्याने एका पोलिस अधिकाऱ्याला हा अहवाल आणण्यासाठी मागील आठवडी पाठविण्यात आले होते. तोही अधिकारी मुंबई येथून रिकाम्या हाताने परतला आहे. टाकीमध्ये सापडलेला हा सांगाडा एका तरुण व तरुणीचा होता. गावातील बेपत्ता युवक साईनाथ इंगोले याचा सांगाडा असल्याचा संशय त्याच्या आई-वडिलांनी व्यक्त केला होता. त्यामुळे कुरूंदा पोलिसांनी साईनाथ इंगोले याच्या आई-वडिलांचे व एका बेपत्ता महिलेच्या नातेवाईकांच्या रक्ताचे नमुने ‘डीएनए’साठी दोन वर्षापुर्वी मुंबईच्या कालिना प्रयोगशाळेत पाठविले होते. दोन वर्षापासून ‘डीएनए’चा अहवाल न आल्याने विविध तर्कवितर्क लावले जात होते. मध्यंतरी प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण उचलून धरल्याने गेल्या आठवड्यात एका फौजदाराला डीएनए अहवाल आणण्यासाठी पाठविले होते; परंतु पोलिस अधिकारी जोंधळे तीन दिवस थांबूनही कालीना प्रयोगशाळेने डीएनए अहवाल दिला नाही. किमान १५ दिवसांनतर हा अहवाल देण्याचे आश्वासन त्या अधिकाऱ्याला मुंबईच्या कालीना प्रयोगशाळेकडून देण्यात आले आहे. त्यामुळे त्या फौजदाराला ‘डीएनए’ अहवालाशिवाय रिकाम्या हाताने परतावे लागले आहे.
मुंबईच्या प्रयोगशाळेतून सांगाड्याचा डीएनए अहवाल येतो की नाही? याबद्दल सध्या संभ्रमावस्था असून डीएनए अहवालाअभावी पोलिस अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले असताना सांगाडा प्रकरणी तपासाला अद्याप गती मिळालेली नाही. डीवायएसपी पियुष जगताप यांच्याकडे हा तपास आहे. पुन्हा नव्याने तपास करण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत आहेत. १५ दिवसानंतर डीएनए अहवाल येतो की, पुन्हा तारीख मिळते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
दरम्यान, वसमतचे उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांनी कुरूंदा येथे मृताच्या नातेवाईकांसह साक्षीदारांचे नव्याने जवाब नोंदविले. या प्रकरणाच्या तपासाला त्यांनी नव्याने सुरूवात केली आहे. (वार्ताहर)
पंधरा दिवस लागणार
वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे दोन वर्षापुर्वी जि.प. हायस्कुल जवळ एका पाण्याच्या कोरड्या टाकीत दोन मानवी सांगाडे आढळले होते.
हा सांगाडा एका तरुण व तरुणीचा होता. गावातील बेपत्ता युवक साईनाथ इंगोले याचा सांगाडा असल्याचा संशय त्याच्या आई-वडिलांनी व्यक्त केला होता.
या सांगाड्यांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी ‘डीएनए’ चाचणीसाठी सांगाड्यांचे अवशेष पाठविले होते.
तसेच साईनाथ इंगोले याच्या आई-वडिलांचे व एका बेपत्ता महिलेच्या नातेवाईकांच्या रक्ताचे नमुने ‘डीएनए’साठी प्रयोगशाळेत पाठविले होते.
पोलिसांनी ‘डीएनए’चा अहवाल न आणल्याने विविध तर्कवितर्क लावले जात होते. मध्यंतरी प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण उचलून धरल्याने गेल्या आठवड्यात एका फौजदाराला अहवाल आणण्यास पाठविले होते.
पोलिस अधिकारी तीन दिवस थांबूनही कालीना प्रयोगशाळेने डीएनए अहवाल दिला नाही.