शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्याला पाणी, प्रस्ताव स्थायीला सादर

By admin | Updated: August 20, 2014 23:53 IST

नांदेड: विष्णूपुरी प्रकल्पातील अत्यल्प साठ्यामुळे शहराला आठवड्यात एक दिवस पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने स्थायी समितीकडे सादर केला

नांदेड: विष्णूपुरी प्रकल्पातील अत्यल्प साठ्यामुळे शहराला आठवड्यात एक दिवस पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने स्थायी समितीकडे सादर केला असून स्थायीच्या सभेत यासंदर्भात निर्णय होणार असल्याची माहिती सभापती उमेश पवळे यांनी दिली़ पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे़ यंदाही एकही मोठा पाऊस न झाल्यामुळे नद्या, नाल्यांना पुर आला नाही़ तसेच जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठ्या प्रकल्पाची पाणीपातळीही वाढली नाही़ विष्णूपुरी प्रकल्पाद्वारे नांदेड शहराला पाणी पुरवठा केला जातो़ या प्रकल्पात उन्हाळ्यात ४० दलघमी पाणी उपलब्ध होते़ त्यामुळे जुन महिन्यापर्यंत शहराला एक दिवसआड पाणी सोडण्यात आले़ मात्र पावसाळ्यात एकाही नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाला नाही़ विष्णूपुरी प्रकल्पात केवळ ७ टक्के जलसाठा उपलब्ध राहिल्याने नांदेड शहराच्या पाणी कपातीचा निर्णय मनपाने घेतला़ त्यानंतर १३ जुलैपासून शहराचा पाणी पुरवठा दोन दिवस आड करण्यात आला़ दरम्यान, दिग्रस बंधाऱ्यातून ९ दलघमी पाणी विष्णूपुरी प्रकल्पात सोडण्यात आले़ या पाण्यामुळे विष्णूपुरी प्रकलत १५ दलघमी पाणी साठा निर्माण झाला़ सध्या विष्णूपुरी प्रकल्पात ९ दलघमी पाणी उपलब्ध असून हे पाणी दोन दिवसआड सोडल्यास ४५ दिवस पुरणार आहे़ याविषयी महापालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा करण्याचे संकेत दिले होते़ पाणी बचतीचे धोरण स्वीकारून पुढील दोन, तीन, महिने हा साठा पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ यासंदर्भात बुधवारी मनपा प्रशासनाने स्थायी समितीसमोर आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव सादर केला़ येत्या २५ आॅगस्ट रोजी स्थायी समितीच्या सभेत या प्रस्तावावर निर्णय होणार असल्याचे सभापती उमेश पवळे यांनी सांगितले़ दरम्यान, महापालिकेने पाणी बचतीचे धोरण राबविण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे़ बांधकामासाठी, वाहने धुणे, रस्त्यावर पाणी टाकणे यावर निर्बंध घातले आहेत़ (प्रतिनिधी)