शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अंगारक चतुर्थीनिमित्त भाविक नांदेडात झाले दाखल

By admin | Updated: July 15, 2014 00:56 IST

विशाल राजूरकर, नांदेड उद्या दि. १५ जुलै रोजी अंगारीका चतुर्थी असून, यानिमित्ताने गाडीपुरा येथील आखाडा गणपती मंदिरात दर्शनासाठी ठिकठिकाणाहून भक्त नांदेडात दाखल झाले आहेत.

विशाल राजूरकर, नांदेडउद्या दि. १५ जुलै रोजी अंगारीका चतुर्थी असून, यानिमित्ताने गाडीपुरा येथील आखाडा गणपती मंदिरात दर्शनासाठी ठिकठिकाणाहून भक्त नांदेडात दाखल झाले आहेत.अंगारीका मंगळवारी आली तर तिला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते़ यादिवशी अनेक जण उपवास करतात़ सायंकाळी मंगलमूर्ती श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जाते. चंद्रोदयानंतर गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडला जातो़ यापूर्वी मंगळवार, १८ फेब्रुवारी २०१४ रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी आली होती़ यानंतरची अंगारीका मंगळवार, ९ डिसेंबर २०१४ रोजी येणार आहे. जुन्या नांदेडातील गाडीपुरा येथील आखाडा गणपती मंदिर हे पुरातण मंदिर असून येथील गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून भाविकांची श्रद्धा आहे़ येथे दर अंगारीकेला चतुर्थीला दूरवरून भाविक दर्शनासाठी येतात़ यानिमित्त अभिषेक, आरती, पूजा मोठ्या प्रमाणात केली जाते़ गणेशभक्तांची गर्दी होत असल्याची माहिती पूजारी रतनबाई हिरासिंग चौव्हाण यांनी दिली़ पुराणातील कथाजेव्हा मंगळवारी संकष्ट चतुर्थी येईल त्यावेळी ती विशेष पुण्यप्रद मानली जाते़ तिला अंगारक संकष्टी किंवा अंगारकी असे म्हणतात़ हा अंगारक कोण, अंगारक म्हणजे मंगऴ तो अंगारकासारखा म्हणजेच जळणाऱ्या निखाऱ्यासारखा लाल-लाल दिसतो म्हणून त्याला अंगारक असे म्हणतात़ याची पुराणात कथा आहे़ अंगारक या भारद्वाज ऋषी पूत्राने कठोर तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतले़ गणपतीने मंगळ (अंगारक) याला वर दिला होता की तुझे नाव 'अंगारक' हे लोकस्मरणात राहील़ हा प्रसन्न होण्याचा दिवस चतुर्थीचा होता़अधिक मासातील अंगारकी चतुर्थी महत्त्वाची मानली जाते़ कारण ती २१ वर्षातून एकदाच येते़