शहरं
Join us  
Trending Stories
1
बुद्धिबळपटू तनिषा बोरामणिकरने बारावीत मिळवले १०० टक्के; पुढचे टार्गेट CA, त्यानंतर UPSC
2
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
3
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
4
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
5
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
6
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
7
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
8
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
9
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
10
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
11
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
12
महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
13
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...
14
दगडफेक अन् खुर्चीफेक, अखिलेश यादवांच्या सभेत उडाला गोंधळ; पोलिसांचा लाठीचार्ज, काय घडलं?
15
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
16
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले
17
एका सेक्स वर्करमुळं २११ ग्राहकांची झोप उडाली; पोलीस करतायेत प्रत्येकाला कॉल
18
IPL Playoffs 2024 Qualifier 1 KKR vs SRH: आजचा सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होणार... जाणून घ्या नियम
19
हिंदी सोडा 'या' साऊथ अभिनेत्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट अन्...
20
२५ वर्षात किती बदलले 'सूर्यवंशम'चे कलाकार; अभिनेत्रीचा मृत्यू, छोटा भानू प्रताप काय करतो?

OBC Reservation : ओबीसी आरक्षणासाठी भाजपा रस्त्यावर; १०० हून अधिक पदाधिकारी, कार्यकर्ते पोलीसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 2:53 PM

OBC Reservation: शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांतील बहुतांश कार्यकर्ते विनामास्क होते.

औरंगाबाद: सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यशासनाने इम्पिरीकल डाटा सादर करणे आवश्यक होते. परंतु शासनाने ओबीसी समाजाबाबत कसलीही आस्था दाखविली नाही. हे सरकार ओबीसी हक्कांच्या विरोधात असल्याचा आरोपकरीत भाजपाने शनिवारी २६ जून रोजी सकाळी आकाशवाणी चौकात चक्काजाम आंदोलन करून सरकार विरोधात जाेरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. आंदोलनात विविध घोषणांचे फलक घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते. ओबीसी के सन्मान में, भाजपा मैदान मे, जो ओबीसी के हित की बात करेगा वही यहाँपर राज करेगा, अशा जाेरदार घोषणा भाजप कार्यकर्ते देत होते. ( BJP agitation for OBC Reservation in Aurangabad ) 

या आंदोलनात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या सर्व नियमांची पायमल्ली झाली. सोशल डिस्टन्स कुणीही पाळले नाही. शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांतील बहुतांश कार्यकर्ते विनामास्क होते. आकाशवाणी चौकातील एका मॉलच्या प्रांगणात कार्यकर्त्यंाना आवाहन करण्यासाठी खा.डॉ.भागवत कराड, आ. अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर आदींनी मार्गदर्शन करतांना राज्यसरकार आरोप केले. यावेळी झालेल्या गर्दीत कुणीही सोशल डिसटन्स पाळले नाही. दरम्यान आंदोलनामुळे जालना रोडवर काही काळासाठी वाहतुक खोळंबली होती.

या नेत्यांना आणि पदाधिकार्यांना पोलीसांनी घेतले ताब्यातखा.डॉ.भागवत कराड, आ.अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर, माजी महापौर भगवान घडमोडे, प्रवीण घुगे, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, समीर राजूरकर, माधुरी अदवंत, अमृता पालोदकर, प्रतिभा जराड, अनिल मकरिये, रामेश्वर भादवे, दीपक ढाकणे, राजू शिंदे, सागर पाले, बालाजी मुंडे, गोविंद केंद्रे, राजगौरव वानखेडे, मनोज भारस्कर, संजय फतेलष्कर, राहूल नरोटे, शालीनी बुंदे, दौलतखान आदींसह १०० हून अधिक पदाधिकारी, कार्यकर्ते जिन्सी व जवाहरनगर पोलीसांनी ताब्यात घेतले. या सर्वाना विष्णुनगर येथील एका मंगल कायार्लयात स्थानबध्द केले. तेथे सर्व नेत्यांनी सरकार विरोधात भाषणे करीत ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याच निवडणुका घेऊ नये, अशी मागणी केली.

पोलीसांचा प्रचंड बंदोबस्तआंदोलनाल हिंसक वळण लागू नये, यासाठी पोलीसांनी आकाशवाणी चौकात प्रचंड बंदोबस्त लावला होता. सेव्हन हिल, मोंढा नाका उड्डाणपुलापासून बॅरिगेट्स लावून वाहतुक बंद केली होती. त्रिमुर्ती चौकापासून बंदोबस्त होता. पोलीस उपायुक्त नीकेश खाटमोडे, दीपक गिर्हे यांच्यासह जिन्सी आणि जवाहरनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक, उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी बंदोबस्तात होते. आंदोलकांनी सुरूवातील चौकात अनेक वाहने अडवून घोषणाबाजी केली. खा.कराड, आ.सावे, शहराध्यक्ष केणेकर, वानखेडे, रामेश्वर भादवे, संजय जोरले आदींनी रस्त्यावरच ठिय्या देत पोलीसांचे वाहन अडविले. पोलीसांनी चौकातील सगळा जमाव नियंत्रणात आणून ताब्यात घेतला.

टॅग्स :BJPभाजपाagitationआंदोलनAurangabadऔरंगाबाद