OBC Reservation : ओबीसी आरक्षणासाठी भाजपा रस्त्यावर; १०० हून अधिक पदाधिकारी, कार्यकर्ते पोलीसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 02:53 PM2021-06-26T14:53:40+5:302021-06-26T15:00:13+5:30

OBC Reservation: शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांतील बहुतांश कार्यकर्ते विनामास्क होते.

OBC Reservation: BJP on the road for OBC reservation; More than 100 office bearers and activists in police custody | OBC Reservation : ओबीसी आरक्षणासाठी भाजपा रस्त्यावर; १०० हून अधिक पदाधिकारी, कार्यकर्ते पोलीसांच्या ताब्यात

OBC Reservation : ओबीसी आरक्षणासाठी भाजपा रस्त्यावर; १०० हून अधिक पदाधिकारी, कार्यकर्ते पोलीसांच्या ताब्यात

googlenewsNext

औरंगाबाद: सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यशासनाने इम्पिरीकल डाटा सादर करणे आवश्यक होते. परंतु शासनाने ओबीसी समाजाबाबत कसलीही आस्था दाखविली नाही. हे सरकार ओबीसी हक्कांच्या विरोधात असल्याचा आरोपकरीत भाजपाने शनिवारी २६ जून रोजी सकाळी आकाशवाणी चौकात चक्काजाम आंदोलन करून सरकार विरोधात जाेरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. आंदोलनात विविध घोषणांचे फलक घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते. ओबीसी के सन्मान में, भाजपा मैदान मे, जो ओबीसी के हित की बात करेगा वही यहाँपर राज करेगा, अशा जाेरदार घोषणा भाजप कार्यकर्ते देत होते. ( BJP agitation for OBC Reservation in Aurangabad ) 

या आंदोलनात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या सर्व नियमांची पायमल्ली झाली. सोशल डिस्टन्स कुणीही पाळले नाही. शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांतील बहुतांश कार्यकर्ते विनामास्क होते. आकाशवाणी चौकातील एका मॉलच्या प्रांगणात कार्यकर्त्यंाना आवाहन करण्यासाठी खा.डॉ.भागवत कराड, आ. अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर आदींनी मार्गदर्शन करतांना राज्यसरकार आरोप केले. यावेळी झालेल्या गर्दीत कुणीही सोशल डिसटन्स पाळले नाही. दरम्यान आंदोलनामुळे जालना रोडवर काही काळासाठी वाहतुक खोळंबली होती.

या नेत्यांना आणि पदाधिकार्यांना पोलीसांनी घेतले ताब्यात
खा.डॉ.भागवत कराड, आ.अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर, माजी महापौर भगवान घडमोडे, प्रवीण घुगे, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, समीर राजूरकर, माधुरी अदवंत, अमृता पालोदकर, प्रतिभा जराड, अनिल मकरिये, रामेश्वर भादवे, दीपक ढाकणे, राजू शिंदे, सागर पाले, बालाजी मुंडे, गोविंद केंद्रे, राजगौरव वानखेडे, मनोज भारस्कर, संजय फतेलष्कर, राहूल नरोटे, शालीनी बुंदे, दौलतखान आदींसह १०० हून अधिक पदाधिकारी, कार्यकर्ते जिन्सी व जवाहरनगर पोलीसांनी ताब्यात घेतले. या सर्वाना विष्णुनगर येथील एका मंगल कायार्लयात स्थानबध्द केले. तेथे सर्व नेत्यांनी सरकार विरोधात भाषणे करीत ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याच निवडणुका घेऊ नये, अशी मागणी केली.

पोलीसांचा प्रचंड बंदोबस्त
आंदोलनाल हिंसक वळण लागू नये, यासाठी पोलीसांनी आकाशवाणी चौकात प्रचंड बंदोबस्त लावला होता. सेव्हन हिल, मोंढा नाका उड्डाणपुलापासून बॅरिगेट्स लावून वाहतुक बंद केली होती. त्रिमुर्ती चौकापासून बंदोबस्त होता. पोलीस उपायुक्त नीकेश खाटमोडे, दीपक गिर्हे यांच्यासह जिन्सी आणि जवाहरनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक, उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी बंदोबस्तात होते. आंदोलकांनी सुरूवातील चौकात अनेक वाहने अडवून घोषणाबाजी केली. खा.कराड, आ.सावे, शहराध्यक्ष केणेकर, वानखेडे, रामेश्वर भादवे, संजय जोरले आदींनी रस्त्यावरच ठिय्या देत पोलीसांचे वाहन अडविले. पोलीसांनी चौकातील सगळा जमाव नियंत्रणात आणून ताब्यात घेतला.

Web Title: OBC Reservation: BJP on the road for OBC reservation; More than 100 office bearers and activists in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.