परिचारिका, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संपात सहभाग, रुग्णसेवेला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 10:05 IST2020-01-08T10:00:43+5:302020-01-08T10:05:57+5:30

कर्मचारी नसल्याने रुग्णांची हेळसांड

Nurse, Fourth-class staff participated in Bharat Bandh, hit the patient service | परिचारिका, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संपात सहभाग, रुग्णसेवेला फटका

परिचारिका, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संपात सहभाग, रुग्णसेवेला फटका

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) परिचारिका आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संपात सहभाग नोंदविला आहे. या संपाचा रुग्णसेवेला संपाचा फटका बसल्याचे दिसून आले.

सकाळी परिचरिका आणि कर्मचाऱ्यांनी घाटी परिसर घोषणांनी दणाणून सोडला.वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयासमोर एकत्र येत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बाह्यरुग्ण विभागाचा वॉर्ड उघडण्यापासून सर्व प्रकारची कामे करण्याची पंचाईत झाली होती आणि अनेक वॉर्ड व अनेक कामे करण्याची वेळ निवासी डॉक्टरांपासून डॉक्टरांपर्यंत सर्वांवर आल्याचे दिसून आले.

Web Title: Nurse, Fourth-class staff participated in Bharat Bandh, hit the patient service