शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
4
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
5
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
6
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
7
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
8
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
9
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
11
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
12
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
13
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
14
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
15
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
16
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
17
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
18
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
19
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
20
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
Daily Top 2Weekly Top 5

नृसिंह सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध

By admin | Updated: February 17, 2016 23:45 IST

मुखेड : देगलूर तालुक्यातील खानापूर येथील नृसिंह सहकारी सूतगिरणीच्या संचालक मंडळाची निवडणूक १५ रोजी तडजोडीनंतर बिनविरोध पार पडली़

मुखेड : देगलूर तालुक्यातील खानापूर येथील नृसिंह सहकारी सूतगिरणीच्या संचालक मंडळाची निवडणूक १५ रोजी तडजोडीनंतर बिनविरोध पार पडली़ यात भाजपाचे नेते माजी खा़ भास्करराव पाटील खतगावकर यांच्या गटाचे १२ तर काँग्रेसच्या गटाचे ७ उमेदवार बिनविरोध काढण्यात आले़ ही निवडणूक बिनविरोध पार पडल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कर्मवीर कलेटवाड यांनी सांगितले़नृसिंह सूतगिरणीची निवडणूक काँग्रेसने प्रतिष्ठेची केली होती़ काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी या निवडणुकीकडे लक्ष दिल्याने निवडणूक अटीतटीची होणार अशी चित्रे दिसून येत होती़ पण १५ रोजी दोन्हीही गटाचे प्रमुख एकत्र बसून निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला व तडजोडीअंती काँग्रेसचे ७ उमेदवार घेण्याचे भाजपाने मान्य केले़ नृसिंह सूतगिरणीच्या एकूण १९ जागापैकी सूतगिरणीचे संस्थापक माजी खा़भास्करराव पाटील खतगावकर, बापूराव सटवाजी शिंदे व एकनाथ तुळशीराम पाटील हे यापूर्वीच बिनविरोध निघाले होते़ पण खतगावकरांच्या निवडीला मोहन पाटील धुप्पेकर यांनी आव्हान देत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती़ धुप्पेकर यांची याचिका फेटाळत खतगावकरांचा उमेदवारी अर्ज १५ रोजी सोमवारी वैध ठरविला़ त्यानंतर निवडणूक बिनविरोध काढण्याच्या तडजोडी मुखेड येथे माजी आ़ अविनाश घाटे यांच्या निवासस्थानी पार पडली़या तडजोडीत भाजपाच्या भास्करराव गटाचे कापूस उत्पादक शेतकरी गटातून भास्कर भिलवंडे, व्यंकटराव पुयड, गंगाधर नरवाडे, अनंतराव पळनीटकर, माधवराव सुगावे, भटक्या विमुक्त जाती मतदारसंघातून सूर्यकांत यन्नलवार, महिला प्रतिनिधी गटातून सुरेखा कन्ने, अनुसयाबाई भारती, तर बिगर कापूस शेतकरी गटातून भास्करराव पाटील खतगावकर, बाबूराव शिंदे, एकनाथ पाटील, तर काँग्रेसकडून कापूस उत्पादक मतदारसंघातून गंगाधर भिंगे, शिवाजी पाटील बेळीकर, नारायण ताडकोले व त्र्यंबक पाटील हंगरगेकर, नीळकंठ शिंदे, अनुसूचित जाती जमाती गटातून मोगलाजी शिरसेटवार तर इतर मागास प्रवर्गातून बालाजी सोनटक्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली़निवडीनंतर घाटे यांच्या निवासस्थानी खतगावकर गटाच्या विजयी उमेदवारांचा भाजपा-शिवसेना मुखेड शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला़ भाजपा सेनेच्या वरील मान्यवरांसह लक्ष्मण ठक्करवाड, गोपाळ पाटील राजूरकर, नामदेव पाटील जाहूरकर, वसंत संबुटवाड, गणपत गायकवाड, बालाजी पाटील कबनूरकर, अवधूत भारती, व्यंकटराव लोहबंदे, अभय पाटील राजूरकर, सुभाष पवार, दत्ता पाटील जिगळेकर, अशोक पाटील मुगावकर, शिवाजी पा़चिवळीकर, बाळू पाटील केसराळीकर, अनंतराव बिराजदार, विलास पाटील राजूरकर, नागनाथ लोखंडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते़ (वार्ताहर)