छत्रपती संभाजीनगरात २ दंड प्रलंबित ठेवणाऱ्याची दुचाकी वाहतूक पोलिस करणार जप्त

By सुमित डोळे | Published: March 12, 2024 12:33 PM2024-03-12T12:33:19+5:302024-03-12T12:34:09+5:30

१२२ एनपीआर कॅमेऱ्यांनी दीड महिन्यांत टिपले ३०,६३० बेशिस्त वाहनचालक, सर्वाधिक २१,८८२ ट्रिपल सीट दुचाकीस्वार, ८,२५० राँग साईड

Now the police will confiscate the two-wheeler of the person who keeps two fines pending | छत्रपती संभाजीनगरात २ दंड प्रलंबित ठेवणाऱ्याची दुचाकी वाहतूक पोलिस करणार जप्त

छत्रपती संभाजीनगरात २ दंड प्रलंबित ठेवणाऱ्याची दुचाकी वाहतूक पोलिस करणार जप्त

छत्रपती संभाजीनगर : दुचाकीवर मान वाकडी करत मोबाइलवर बोलणे, सर्रास उलट दिशेने जाणे, एका दुचाकीवर तीन ते चार जण बसणाऱ्या तब्बल ३० हजार ६३० बेशिस्त वाहनचालकांना एनपीआर कॅमेऱ्यांनी कैद केले आहे. गेल्या ४१ दिवसांमध्ये कैद झालेल्या या बेशिस्त वाहनचालकांना २ कोटी ८४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला परंतु ऑनलाईन नोटिसला अद्यापही सकारात्मक प्रतिसाद नसल्याने पोलिसांनी कठोर भूमिका घेण्याचे ठरविले आहे. कुठल्याही पकडलेल्या दुचाकीवर दोनपेक्षा अधिक जण दंड आढळल्यास ती उर्वरित दंड भरेपर्यंत जप्त केली जाईल, असे उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांनी स्पष्ट केले.

२६ जानेवारीला स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत या प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाच्या ई-चलान प्रणालीला हा प्रयोग जोडण्यात आला आहे. ज्या चौकांमध्ये पोलिस उपस्थित नसतील, कमी प्रमाणात असतील अशा १२२ कॅमेऱ्यांचा या एएनपीआर (ऑटोमॅटिक नंबरप्लेट रिकग्नायझेशन) प्रणालीत समावेश आहे.

एएनपीआर प्रणाली काय आहे ?
-ऑटोमॅटिक नंबर रिकग्नायझेशन आणि रेड लाईट व्हायोलेशन डिटेक्शन कॅमेरा, अशा दोन प्रकारच्या प्रणालींचा त्यात समावेश आहे.
- पोलिस आयुक्तालय व मनपाच्या स्मार्ट सिटीच्या सीसीसी (कमांड कंट्रोल सेंटर) मध्ये याचे सर्व्हर कार्यरत असेल.
-१७ जंक्शन (चौक) वर १२२ अद्ययावत कॅमेऱ्यांद्वारे ही प्रणाली संलग्न आहे.
-याद्वारे कॅमेरे सॉफ्टवेअरद्वारे वाहनाची नंबर प्लेट टिपून सर्व्हरला छायाचित्र, वाहनाच्या सर्व माहितीसह पाठवतात.
- त्यात प्रामुख्याने विना हेल्मेट, सिग्नल मोडणे, झेब्रा क्रॉसिंग, ट्रिपल सीट, राँगसाईड जाणारी वाहने कैद करण्याची कमांड या साॅफ्टवेअरला देण्यात आल्या आहेत. त्यानंतर एआयद्वारे हे कॅमेरे अशा वाहनचालकांना कैद करून नंबर प्लेटसह छायाचित्र काढतात. तासाला एका जंक्शनवर ५०० छायाचित्रे निघतात.
-वाहनाच्या इत्यंभूत माहितीसह सीसीसीमध्ये छायाचित्र उपलब्ध झाल्यावर शेवटच्या टप्प्यात पोलिस दंडयोग्य वाटल्यास क्लिक करतात. त्यानंतर वाहनचालकाला ३ ते ५ सेकंदांत आरटीओ नोंदणीकृत मोबाइलवर नोटीस प्राप्त होते.

कॅमेऱ्याची १३ मीटरपर्यंत नजर
-साऊथ कोरिया कंपनीनिर्मित अद्ययावत तंत्रज्ञयुक्त.
-५ मेगापिक्सेल व नाईट व्हिजन कॅमेरे.
-कुठल्याही वातावरणात सक्षमपणे कार्यरत.
-सिग्नलच्या १३ मीटर अंतरावर कॅमेरे.

२६ जानेवारी ते १० मार्चपर्यंतची आकडेवारी 
-या प्रणालीद्वारे एकूण ३०,६३० वाहनचालकांना २ कोटी ८४ लाख ८ हजारांचा दंड.
-२१ हजार, ८८८ ट्रिपल सीट.
-८,३२३ वाहनचालकांनी उलट दिशेने येताना कैद.
-१५७ वाहनचालकांनी सिग्नल तोडले.
-२६२ वाहनचालक मोबाईलवर बोलताना कैद.

Web Title: Now the police will confiscate the two-wheeler of the person who keeps two fines pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.